मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : सापडली..सापडली, 12 आमदारांची यादी सापडली, राजभवनाकडून अखेर खुलासा

BREAKING : सापडली..सापडली, 12 आमदारांची यादी सापडली, राजभवनाकडून अखेर खुलासा

'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी असून त्याबाबत राज्यपाल योग्य भूमिका घेतली'

'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी असून त्याबाबत राज्यपाल योग्य भूमिका घेतली'

'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी असून त्याबाबत राज्यपाल योग्य भूमिका घेतली'

मुंबई, 25 मे : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची (MLAs appointed by Governor) यादी राजभवनातून गायब झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांवर (Governor Bhagat Singh) एकच टीकेची झोड उडवली होती. पण, अखेर आता 12 सदस्यांची यादी गायब झाली नसून सापडली आहे, अशी माहितीच राजभवनातील (Rajbhavan ) सूत्रांनी दिली आहे.

राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादी उपलब्ध नाही असा दावा माहिती अधिकार अंतर्गत मागण्यात आलेल्या अर्जावर करण्यात आल्यानंतर न दोन-तीन दिवस झाले राजभवनाच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून टीका करण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांकडून देखील विधान परिषद सदस्य नामनियुक्त यादी देण्यात आली होती. पण तरीदेखील मंजूर करण्यात आली नाही, आता गायब झाली असे उत्तर का देते आहेस अशा स्वरूपाची टीका करण्यात आली. अखेर या प्रकरणावर राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे.

FD मध्ये पैसे गुंतवताय? योग्य वेळी जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळतील ते वाचा..

राजभवनाकडे विधान परिषद 12 सदस्यांची यादी आपल्याकडे आहे, असा दावा राजभवन सूत्रांनी दिली. यादी हरवली नाही, विनाकरण गैरसमज करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने माहिती अधिकार विभागात माहिती मागितली त्या विभागाकडे लिस्ट नावे नव्हती त्यामुळे त्या विभागाने त्यांच्याकडे सदस्य नावे नाहीत, असे उत्तर दिले, अशी सारवासारव राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

तसंच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी असून त्याबाबत राज्यपाल योग्य भूमिका घेतली, असे राज्यभवनातील अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली.

असा हवा जिल्हाधिकारी! गरीबाच्या 2 दिवसाच्या मुलाला वाचविण्यासाठी धावले..

राज्यपाल नियुक्त जागेवरून महाविकास आघाडी आणि राजभवन असा संघर्ष होत होता. आता यावरूनच राजभवनामधील वरिष्ठ सूत्रांनी याबाबत अधिकृत खुलासा केल्याने गेले काही दिवस सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक आता राजभवन पुढील काही दिवसात यादीवर योग्य ती भूमिका घेते का की परत अजून यादी मंजूर करण्यास वाट पाहावी लागेल ते स्पष्ट होईल.

काय घडलं होतं नेमकं?

विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली यादी राज्यपाल सचिवालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस राज्यपाल सचिवालयाने दिली होती.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी माहिती विचारली होती की, 'मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी. तसंच मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जावर 19 मे 2021 रोजी राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले की, 'राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी ( प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही.'

पावसाळ्यात वाढतात Skin infection; अशी घ्या काळजी

अनिल गलगली यांनी संभ्रमित करणाऱ्या माहिती बाबत प्रथम अपील दाखल केले आहे. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री सांगतात की यादी पाठविली आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री सचिवालयाने यादी देण्यास यासाठी नकार दिला होता की अजून अंतिम निर्णय झाला नाही आणि आता राज्यपाल सचिवालय वेगळेच उत्तर देत आहे. अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की, खरोखरच यादी पाठविली असेल तर मुख्यमंत्री सचिवालय आणि राज्यपाल सचिवालय यापैकी एकाने माहिती सार्वजनिक करावी. राज्यपालांने यादी असल्यास त्यावर होय किंवा नाही, असा एकतरी निर्णय घेत कोंडी सोडवावी. याच मुद्यावरून सत्ताधारी आणि राजभवनात दोन दिवसांत जोरदार वाद पेटला होता.

First published: