• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • असा हवा जिल्हाधिकारी! गरीबाच्या 10 दिवसाच्या मुलाला वाचविण्यासाठी धावले शैलेश नवाल, प्रशासनाचं होतंय कौतुक

असा हवा जिल्हाधिकारी! गरीबाच्या 10 दिवसाच्या मुलाला वाचविण्यासाठी धावले शैलेश नवाल, प्रशासनाचं होतंय कौतुक

जिल्हाधिकारी यांनी तातडीने घेतलेला निर्णय, डॉक्टरांकडून मिळालेला धीर यामुळेच माझं बाळ कोरोनावर मात करू शकला, अशी भावना बाळाच्या आईने व्यक्त केली.

 • Share this:
  अमरावती, 25 मे : घरातली परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि दहाव्या दिवशी कोरोना झालेल्या बालकाला वेळीच प्रशासनाची मदत मिळाल्याने त्याला कोरोनावर मात करणे शक्य झाले आहे. वरूड तालुक्यातील अंबाडा येथील अपेक्षा सचिन मरसकोल्हे या 23 वर्षीय महिलेने 16 एप्रिल रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र 2 दिवसांनंतरच ताप यायला लागल्याने वरूड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ताप कमी होत नसल्याने कोरोना तपासणी केली असता तो positive निघाला, त्याला तातडीने 28 एप्रिल रोजी अमरावतीच्या सूपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या  रुग्णालयात लहान मुलांचं व्हेंटीलेटर व इतर सुविधा नसल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी या बाळाला होप या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे बाळावर बालरोग तज्ज्ञ डॉ. अद्वैत पानट यांनी उपचार केले. डी पानट यांनी सिपिएपी मशीन द्वारे ऑक्सिजन दिले. रेमडिसीवीर हे इंजेक्शन सुद्धा या बाळाला देण्यात आले. येवढ्या कमी वयात हे इंजेक्शन घेणारे राज्यातील पहिले बालक असल्याचे डॉ पानट यांनी सांगितले. हे ही वाचा-इथं पोहोचला नाही कोरोना लशीचा एकही डोस; कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान आता हे बाळ कोरोनावर यशस्वी मात करून तब्बल 22 दिवसानंतर घरी परतले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. येवढ्या मोठ्या रुग्णालयात खर्च कसा करावा हा प्रश्न बालकाच्या आई-वडिलांपुढे होता. मात्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ श्यामसुंदर निकम यांनी सामाजिक भान जपत बालकाचा संपूर्ण खर्च शासन करणार असे डॉ पानट यांना सांगितले. बाळाला दवाखान्यात दाखल केले, तेव्हा बाळाची तब्बेत खुप नाजूक होती. आता तो सुखरुप आहे, जिल्हाधिकारी यांनी तातडीने खाजगी रुग्णालयात खर्च करण्याचा घेतलेला निर्णय दवाखान्यात सर्व डॉक्टरांकडून मिळालेला धीर, कुटुंबीयांकडून आधार यामुळेच माझं बाळ कोरोनावर मात करू शकला, अशी भावना बाळाच्या आईने व्यक्त केली. खाजगी रुग्णालयात आलेला एकूण खर्च 1 लाख 64 हजार रुपये सर्व जिल्हाधिकारी यांनी शासकीय खर्चातून केला. आम्हाला एक रुपयाही खर्च आला नाही असे बाळाची आई अपेक्षा मरसकोल्हे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तातडीने उपचाराचा खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने बाळाला नवे जीवनदान मिळाले.
  Published by:Meenal Gangurde
  First published: