दिल्ली, 25 मे : उन्हाळ्यानंतर येणाऱ्या दमट वातावरणाला सुरुवात झाली आहे. हवेतली आर्द्रता वाढू लागली आहे. पहिल्या पावसाचा (Rain after Summer) अनुभव आपल्या सगळ्यांनाच सुखवणारा असतो. पण पावसाळ्याच्या सुरुवातीला उष्ण आणि दमट (Hot and humid) वातावरणामुळे अनेक आजार वाढायला लागतात. याच वातावरण माइक्रोब्स (Micro Organisms) आणि बुरशी (Fungus) वेगाने वाढायला लागतात.
(Vaccination मोठी बातमी! आता ऑनलाईन रजिस्टर न करता 18 ते 44 वयोगटालाही मिळणार लस)
ज्यामुळे आपल्या त्वचेवर मुरुम (Pimple) आणि ब्रेकआउट्स(Breakouts) देखील व्हायला लागतात. एवढच नाही तर, पावसाळ्यात त्वचा उन्हाळ्यापेक्षा जास्त तेलकट बनते, ज्यामुळे त्वचेशी निगडीत बर्याच समस्या (Skin Problem) उद्भवू लागतात. सध्या कोरोना (Corona)काळात तर, आपल्याला पावसाळ्यात बदलणाऱ्या वातावरणाबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. तर, पावसाळ्यात वाढणाऱ्या बुरशी आणि बॅक्टेरियांपासून स्वतःचं रक्षण कसं करता येईल? हे जाणून घेऊयात.
(पंजाबी अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केल्याने केएल राहुल चर्चेत)
अशी घ्या काळजी
नेहमी हलके आणि सैल कपडे घाला. त्यामुळे आपली त्वचा योग्य प्रकारे श्वास घेऊ शकेल आणि त्वचेवर कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल.
नेहमीच चांगले सुकलेले आणि स्वच्छ कपडे घाला. तुम्हाला जास्त घाम येत असले तर,काही तासांनी कपडे बदला.
या काळात प्रॉपर हायजीन आवश्यक आहे. त्यामुळे दिवसातून दोनदा अंघोळ करा,काही तासांनी हातपाय स्वच्छ करा,दर काही दिवसांनी नखं कापा.
(भयंकर! इटलीमध्ये केबल कार कोसळून 12 जणांचा मृत्यू, दोन जखमी)
आपला टॉवेल,नेलकटर, नॅप्कीन वेगळा ठेवा.
सार्वजनिक ठिकाणी वावरताना तिथे ठेवलेले चप्पल घालणं टाळा. घरी देखील पायात चप्पल घाला.
अंडर आर्ममध्ये खुप घाम येत असेल तर, स्वेट ऐब्जॉर्बिग पॅच वापरा.
(बाळगू नका संकोच; मुलांसाठी लैंगिक शिक्षण महत्वाचं; या वयात द्या कल्पना)
त्वचेवर रॅशेस येत असतील तर, अशी काळजी घ्या.
रॅशेस येणारा भाग शक्य तितका स्वच्छ ठेवा.
ज्या भागात पुरळ आलं आहे. तिथे अँटी-फंगल किंवा अँटी-बॅक्टेरियल क्रीम वापरा.
पुरळ येणाऱ्या भागावर अँटीसेप्टिक पावडरही वापरू शकता.
खाज सुटणं, जळजळ, पुरळ कमी करण्यासाठी बर्फाने शेक घ्या. यामुळे वेदना, जळजळ कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Rain, Skin care