मेट्रो-3 चे काम रात्रीच्या वेळेस नाहीच – हायकोर्ट

कुलाबा ते सीप्झ या दरम्यान मुंबई मेट्रो-3 चे काम रात्रीच्या वेळी करण्यास हायकोर्टानं मनाई कायम ठेवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2018 08:56 PM IST

मेट्रो-3 चे काम रात्रीच्या वेळेस नाहीच – हायकोर्ट

मुंबई, ता. 18 जुलै : कुलाबा ते सीप्झ या दरम्यान मुंबई मेट्रो-3 चे काम रात्रीच्या वेळी करण्यास हायकोर्टानं मनाई कायम ठेवली आहे. 2 ऑगस्टला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आल्यानंतर रात्रीची परवानगी द्यायची की नाही, याविषयी निर्णय देऊ असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. मात्र, उद्या या याचिकेवरचा औपचारिक अंतरिम आदेश देणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

घटनेच्या कलम २१ नुसार, नागरिकांना जगण्याचा अधिकार आणि वाहतुकीसाठी लोकांना निर्माण होत असलेला नवी वाहतूक व्यवस्थेचा फायदा या दोन्ही बाबी लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. मेट्रो ३ च्या मार्गावर नेमकं किती ध्वनी प्रदूषण होतं याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. पण अपु-या मनुष्यबळाआभावी मंडळानं हे कामा नीरी या संस्थेला दिलंय. नीरीकडून हा अहवाल प्राप्त झाल्यावर मंडळ कोर्टासमोर हा अहवाल सादर करणार आहे.

शबरीमलातही महिलांना प्रवेशाचा हक्क, पूजेचा अधिकार सर्वांना - सुप्रीम कोर्ट

मेट्रो ३ च्या रात्री सुरु असलेल्या कामामुळे नागरिकांना झोपणं अशक्य झालं असून हे काम करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका कफ परेड येथील रहिवासी रॉबिन जयसिंगानी यांनी दाखल केली आहे. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मेट्रोचं काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही मनाई हायकोर्टानं २ ऑगस्टपर्यंत कायम ठेवली आहे.

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

Loading...

..अन्यथा या सरकारला आरबी समुद्रात बुडवू - परळीत मराठा समर्थक आक्रमक

..अन्यथा औरंगाबाद महापालिका बरखास्त करु – मुख्यमंत्री

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...