दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्याच्या राजकारणात रस नाही हे फार काही लपून राहिलेलं नाही. त्यांना अनेक वेळा राज्यात परतणार का असं विचारलं गेलं पण त्यावर त्यांनी प्रत्येकवेळी आपल्या शैलीत उत्तर देऊन टाळलं.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : दुधाच्या दरात पाच रुपये अनुदान मिळावा यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. सरकारकडूनही नागपूर ते दिल्ली चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. पण या निमित्ताने भाजपचे नेते केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूध आंदोलन हाताळताना दिसून येत आहे. पण दूधाच्या प्रश्न नेमकं नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस सोडवणार असा प्रश्नच राजू शेट्टी यांनी उपस्थितीत केलाय.

दूधकोंडी करण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा डहाणून स्टेशनवर रेल रोको

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्याच्या राजकारणात रस नाही हे फार काही लपून राहिलेलं नाही. त्यांना अनेक वेळा राज्यात परतणार का असं विचारलं गेलं पण त्यावर त्यांनी प्रत्येकवेळी आपल्या शैलीत उत्तर देऊन टाळलं. मध्यंतरी अशीही चर्चा सुरू होती की देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील आणि गडकरी राज्यात...पण ही चर्चा हवेत विरली. पण आता राज्यात पेटलेल्या दूध आंदोलनावरून पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या मध्यस्थी पाहण्यास मिळत आहे. कालच नितीन गडकरी  दुधाच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांमध्ये तोडगा काढू असं आश्वासन दिलं. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिलीय. नितीन गडकरी यांनी दूध आंदोलकांना धीर धरण्याचा सल्ला दिलाय. आंदोलकांनी मागणी केल्याप्रमाणं 5 रूपये देण्याची तयारीही केंद्राने दाखवली आहे.

तर दुसरीकडे नागपूर पावसाळी अधिवेशनात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी दूध आंदोलनावरून ठाम भूमिका घेत सरकारसोबत चर्चा करायला असं राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूध आंदोलनाची दखल घेत लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलंय.

दरम्यान, आमच्या आंदोलनाबाबत नितीन गडकरी पाहतात की मुख्यमंत्री असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. एकीकडे गडकरी दिल्लीत म्हणतात दोन दिवसात विचार करून निर्णय घेऊ तर मुख्यमंत्री म्हणतात उद्या मी सदनामध्ये निर्णय घेईल.या वरून सरकारमध्ये निणर्याबाबत गोंधळाचे वातावरण असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य हे केंद्र सरकार चालवतंय, आणि त्यामुळे अमूलसारख्या गुजरातमधल्या कंपन्यांना महाराष्ट्रात मोकळं रान मिळावं, म्हणून हे सगळं सुरू आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारला स्वत:ची भूमिका नाही का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

हेही वाचा

तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद

 मिग-21 विमानाचा हवेत स्फोट, तुकडे-तुकडे होऊन कोसळले

अजब मनपाचा गजब दावा, प्लास्टिक बंदीमुळे मुंबईत कमी पाणी तुंबलं

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 06:09 PM IST

ताज्या बातम्या