S M L

..अन्यथा औरंगाबाद महापालिका बरखास्त करु – मुख्यमंत्री

आधी शहरात साचलेली घाण उचला, अन्यथा महापालिका बरखास्त करु असा र्निवाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद महापालिकेला दिलाय.

Updated On: Jul 18, 2018 06:07 PM IST

..अन्यथा औरंगाबाद महापालिका बरखास्त करु – मुख्यमंत्री

नागपूर, ता. १८ जुलै : आधी शहरात साचलेली घाण उचला, अन्यथा महापालिका बरखास्त करु असा र्निवाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद महापालिकेला दिलाय. नागपूर अधिवेशनादरम्यान औरंगाबादचे महापालिकेचे आयुक्त आणि महापौर याच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी ही तंबी दिली.

औरंगाबादचे महापौर आणि महापालिका आयुक्तांनी बुधवारी नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ शहरातली घाण साफ करा असे आदेश दिलेत. ती न झाल्यास महापालिका बरखास्तीचा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे आता शहरात साचलेल्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट कोठे लावायची असा यक्षप्रश्न औरंगाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यासमोर उभा ठाकला आहे.

मिग-21 विमानाचा हवेत स्फोट, तुकडे-तुकडे होऊन कोसळले

गेल्या 5 महिन्यांपासून संपूर्ण राज्यात औरंगाबादचे महापालिकेचा कचरा गाजतोय. दिड-दोन  महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद भेटी दरम्यान महापालिका क्षेत्रात साचलेला कचरा शेड-नेट ने झाकून ठेवण्याचा प्रकार घडला होता. औरंगाबादमधील कचऱ्याची समस्या अजुनही कायम असून, महापालिका क्षेत्रात अजुनही कमालीचा कचरा साचलेला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न र्निमाण झाला असून, सद्या शहरात सर्वत्र रोगराईचे वातावरण पसरलेले आहे. पावसामुळे त्यात आणखीनच वाढ झाली असून, प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महापालिकेला दिलेल्या या र्निवाणीच्या इशाऱ्यामुळे आता महापालिकेचे अधिकारी कोणती पावले उचलतात याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा...

Loading...
Loading...

VIDEO : कोल्ड स्टोरेजमध्ये भीषण स्फोट, 3 ठार

विरोधकांनीच मराठा समाजाला फसविले – तावडे

मराठा मोर्चाचं भगव वादळ पुन्हा मुंबईकडे, परळीत ठिय्या आंदोलन

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 06:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close