शबरीमलातही महिलांना प्रवेशाचा हक्क, पूजेचा अधिकार सर्वांना - सुप्रीम कोर्ट

केरळमधल्या सुप्रसिध्द शबरीमला मंदिरात पुरुषांप्रमाणंच महिलांनाही प्रवेश आणि पुजा करण्याचा अधिकार आहे अशी महत्वाची भूमिका सुप्रीम कोर्टानं घेतलीये.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2018 08:15 PM IST

शबरीमलातही महिलांना प्रवेशाचा हक्क, पूजेचा अधिकार सर्वांना - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली,ता.18 जुलै : केरळमधल्या सुप्रसिध्द शबरीमला मंदिरात पुरुषांप्रमाणंच महिलांनाही प्रवेश आणि पुजा करण्याचा अधिकार आहे अशी महत्वाची भूमिका सुप्रीम कोर्टानं घेतलीये. महिलांना प्रवेश देण्यावरुन सुरु असलेल्या वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं महिलांच्या मंदिर प्रवेशासंदर्भात ही महत्वाची टिप्पणी केली आहे. मुख्य न्यायाधिश दिपक मिश्रा यांनी मंदिर प्रशासनाला खडे बोल सुनावले. कुठल्या आधारावर महिलांना प्रवेशापासून रोखलं जातं असा सवाल कोर्टानं केला. असं कृत्य हे संविधानाच्या विरोधात आहे असंही कोर्टानं सुनावलं आहे.सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश डी.वाय.चंद्रचूड यांनी मंदिर ही कुणाची खाजगी मालकी नाही, जी जागा सार्वजनिक आहे, तिथे जाण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही. संविधानाने पुजा करण्याचं स्वातंत्र्य जितकं पुरुषांना दिलंय तितकंच महिलांनाही दिलंय.

क्रुरता!,महिलेला बेदम मारहाणीत गर्भातल्या अर्भकाचा मृत्यू

संभाजी भिडेंची स्फोटक मुलाखत, जशी आहे तशी : मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी?

कोर्टाच्या या भुमिकेमुळं शबरीमाला मंदिरांत महिलांचा प्रवेश सुकर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. न्यायालयाच्या या दणक्यामुळे आता शबरीवलाचीही दारं महिलांसाठी खुली होणार आहेत. या आधी महाराष्ट्रात शनीशिंगणपूर इथं शनी मंदिराची दारं महिलांसाठी खुली झाली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे देशात ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश बंदी आहे. त्या सर्व मंदिरांना आता आपली दारे खुली करावी लागणार आहेत.

..अन्यथा या सरकारला आरबी समुद्रात बुडवू - परळीत मराठा समर्थक आक्रमक

काय आहे प्रकरण ?

केरळमधल्या पश्चिमी घाटात असलेल्या शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्ष वयापर्यंतच्या स्त्रीयांना प्रवेश वर्ज्य आहे.

या वयात महिलांना मासिक पाळी येत असल्यानं त्यांना प्रवेश वर्जित केल्याचं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात श्रध्दाळुंसाठी हे मंदिर खुलं केलं जातं.

महिलांना प्रवेश मिळावा यासाठी द इंडियन यंग लायर्स असोसिएशनने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

केरळ सरकार, द त्रावणकोर देवस्थानम् बोर्ड, मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या सहित जिल्हाधिका-यांना यात प्रतिवादी करण्यात आलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close