Home /News /mumbai /

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अभिनेत्री केतकी (Ketaki Chitale) चितळेच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.

मुंबई, 18 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात  हजर करण्यात आले. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Ketaki Chitale sent to 14 days judicial custody) ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आणखी एक कलम वाढवले आहे. आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केतकी चितळे हिची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर केतकी चितळेकडून जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 मे रोजी केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम 153, कलम 500, कलम 501, कलम 505, कलम 504 आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर केतकीला नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली. केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: NCP, Sharad Pawar (Politician), Thane

पुढील बातम्या