Home /News /maharashtra /

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत, शरद पवारांविषयीच्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत, शरद पवारांविषयीच्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. सोशल मीडियात केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  विनोद राठोड, प्रतिनिधी ठाणे, 14 मे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे चर्चेत आली आहे आणि ती म्हणजे तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे (Controversial Facebook Post of Actress Ketaki Chitale). केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त फेसबूक पोस्टनंतर कळवा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे. केतकी चितळेने केलेल्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियातूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडिया युजर्सने केतकीला सुनावलं आहे. तसेच या पोस्टमुळे अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. वाचा : नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार काय म्हटलं आहे तक्रारीत? कळवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मी स्वत: व माझे सारखे इतर कार्यकर्ते उद्वीग्न झालेलो आहोत. तसेच केतकी चितळे हिने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केलं आहे. सदर महिलेने आणखी देखील पोस्ट केल्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांना उद्देशून बदनामीकारक आणि द्वेषकारक पोस्ट करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे. यापूर्वीही केतकी चितळे वादात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका कॉमेडियनने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चौफेर टीका झाली. मात्र त्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्रमक फेसबुक लिहित कॉमेडियनवर टीका करणाऱ्यांचाच समाचार घेतला होता. त्यानंतर केतकीच्या या पोस्टवरून मराठीतील ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केतकी चितळे हिच्यावर निशाणा साधला होता. 'मराठीमध्ये एक केतकी नावाची एक अभिनेत्री आहे, जी तिच्या पोस्टमधून समाजामध्ये तिढा, द्वेष कसा निर्माण होईल, याचाच प्रयत्न करत आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने महाराष्ट्राचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. जो मलाच नाही तर अनेकांना खटकला आहे,' अशा शब्दांत महेश टिळेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना महेश टिळेकर यांनी केतकीला आक्रमक शब्दांमध्ये फटकारलं होतं.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Sharad Pawar (Politician)

  पुढील बातम्या