राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केतकी चितळेच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आता मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही केतकी चितळेचा चांगलाच समाचार घेतल आहे.
मुंबई, 15, मे-अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar ) यांच्यावर खालच्या भाषेत टिका केली होती. केतकी चितळेला ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. तिचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आता मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केतकी चितळेचा चांगलाच समाचार घेतल आहे.
किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केतकीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला त्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही. ती मनोरुग्ण आहे. त्याचे ती धडे घेत आहे. तिला मधुनच झटका येतो. त्या झटक्यात काही झालं असेल त्यामुळे तिनं अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली असेल. त्यामुळे तिच्यावर टीका होत असल्याचे किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
वाचा-'शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा.... ' अमोल कोल्हे केतकीवर भडकलेकेतकीची पोस्ट नेमकी काय आहे ?
अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
वाचा-'स्त्रीत्वाच्या आड लपून विष ओकनारी प्रवृत्ती ठेचलीच पाहिजे', आव्हाड संतापले
केतकी चितळे हिने अनेकदा वादग्रस्त टिप्पण्या करून वाद ओढवून घेतले आहेत. नवबौद्धांसंदर्भातील टिप्पणीप्रकरणी तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल झाली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हाही दाखल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून तिने वाद ओढवून घेतला होता. कोणत्या कोणत्या कारणाने ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.