मुंबई, 10 मार्च : कल्याण डोंबिवली महापालिकेने वाढत्या कोरोना रुग्णांची (Coronavirus new restrictions latest updates ) संख्या लक्षात घेऊन कडक निर्बंध घालायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासांस कल्याण डोंबिवली हद्दीत (KDMC lockdown news) रुग्णसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे आयुक्तांनी तातडीची बैठक घेत गुरुवारपासूनच नवे अधिक कडक निर्बंध (New covid restrictions in kalyan dombivali) लागू करायचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संध्याकाळी 7 नंतर कल्याण- डोंबिवलीतले व्यवहार बंद ठेवायची तरतूद यात आहे. तसंच शनिवार-रविवार रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं उघडी राहतील. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाउन असेल, इतरत्र दैनंदिन व्यवहार सुरू राहिले, तरी संध्याकाळी 7 नंतर पोळी भाजी केंद्र वगळता अन्य सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लसीकरण सुरू असताना Covaxin कोरोना लशीबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय
कल्याण डोंबिवलीचे आयुक्त (Kalyan Dombivali commissioner) डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये नागरिक कोरोनाचे सामाजिक अंतर नियम (social distancing norms) पाळत नसल्याचं सांगितलं गेलं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता अधिक कडक निर्बंध लावून त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मास्क न लावणे, गर्दी करणे असे नियम न पाळणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.
काय सुरू काय बंद?
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतले सगळे आठवडी बाजार बंद
भाजी मंडई फक्त निम्म्या क्षमतेने सुरू राहणार. म्हणजेच एका आड एक गाळेच उघडे राहतील. प्रत्येक भाजी विक्रेत्याच्या शेजारचा ओटा रिकामा राहील. किमान 6 फुटांचं अंतर ठेवूनच बसायची परवानगी.
सर्व दुकानं (अत्यावश्यक सेवा, मेडिकल आणि खाण्या-पिण्याची हॉटेल्स, स्टॉल्स वगळता) संध्याकाळी 7 नंतर बंद होतील.
वाचा - मुंबईकरांवर लॉकडाऊनचं संकट? तयारी पूर्ण आयुक्तांनी दिले संकेत
शनिवार- रविवार रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं (जीवनावश्यक सेवांची दुकानं वगळता) उघडतील. P1, P2 चे नियम पाळण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर
सर्व दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वेळात सुरू राहतील.
पोळी भाजी केंद्र रात्री 11 पर्यंत उघडी ठेवायला मुभा
खाद्यपदार्थांच्या गाड्या, आइस्क्रीम पार्लर रात्री 11 नंतर बंद.
मद्यविक्री रात्री 11 पर्य़ंत सुरू राहील.
प्रवासी रिक्षांत दोनपेक्षा अधिक प्रवासी नाही
सर्व मंगल कार्यालयं, हॉल यांना नियम पालनाचे आदेश. समारंभाचा व्हिडीओ पालिकेकडे सोपवायचा. नियमापेक्षा अधिक माणसं दिसली तर थेट फौजदारी कारवाई होणार.
मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार.
कल्याण डोंबिवलीत 24 तासांत 392 रुग्ण
10 मार्चला कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. 24 तासांत रुग्णवाढीचा दर प्रचंड वाढला. नवीन रुग्णांची संख्या दुप्पट झाली. एकाच दिवसात 392 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं.
दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या
10 मार्च - रुग्ण 392
9 मार्च रुग्ण 218
8 मार्च 198
7 मार्च 271
6 मार्च 210
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Dombivali, KDMC, Lockdown