मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपत गेलेले नेते स्वगृही परतण्याच्या तयारीत : नवाब मलिक

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपत गेलेले नेते स्वगृही परतण्याच्या तयारीत : नवाब मलिक

Nawab Malik: भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं खिंडार पडणार असल्याचे संकेत राज्चाचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत.

Nawab Malik: भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं खिंडार पडणार असल्याचे संकेत राज्चाचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत.

Nawab Malik: भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं खिंडार पडणार असल्याचे संकेत राज्चाचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहेत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 27 नोव्हेंबर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पडणार असल्याच्या अनेक तारखा भाजपच्या नेत्यांकडून येत आहेत. त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी म्हटलं, मार्च महिन्यात मविआ सरकार कोसळून महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार. नारायण राणे यांनी केलेल्या या विधानानंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटोही व्हायरल झाला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. यावर राष्ट्रवादीने स्पष्टीकरण देत तो फोटो मॉर्फ केलेला असल्याचं सांगितलं. मविआ सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार तसेच भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची पुन्हा घरवापसी होणार असल्याचंही म्हटलं आहे. (Nawab Malik claimed those who join bjp from NCP, Congress will return home soon)

नवाब मलिक म्हणाले, शरद पवार, प्रफुल्ल पटेल हे काल दिल्लीला पार्लमेंटच्या डिफेन्स कमिटी मीटिंगसाठी गेले होते. दरम्यान नारायण राणे यांचं वक्तव्य आलं की, मार्च महिन्यात आम्ही सरकार बनवणार. नारायण राणे यांच्या वक्तव्यनंतर एक पॉर्फ फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आली. ज्यात अमित शहा शानमध्ये बसले आहेत आणि शरद पवारांचा ज्या प्रकारे फोटो दाखवण्यात आला आहे तो अपमानित करण्यासाठी मॉर्फ फोटो होता. भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा जास्त वेळ चालणार नाही.

वाचा : अनिल देशमुख यांच्याप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान सुरू, अमित शहांकडे तक्रार करणार : नवाब मलिक

सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, देवेंद्रजी वारंवार भविष्यवाणी करण्यात येत आहे. चंद्रकातं पाटील स्वप्न पाहून उठत राहिले. आता नारायण राणे... 1999 मध्ये मुख्यमंत्रिपद गेलं आणि त्या पदासाठीच ते काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर भाजपत आले. त्यानंतर ते प्रत्येक वर्षी नवस करत आहेत. बोकड, कोंबड्या कापण्याचा प्रकार ते करत आहेत परंतु अजूनही नवस पूर्ण झालेला नाही. त्यांनी लक्षात घ्यावं ही सरकार दिवसेंदिवस भक्कम होत चाललेले आहे असंही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक पुढे म्हणाले, त्यांना हे ही सांगतो लवकरच भाजपमध्ये असणारे अनेक आमदार आता पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाजप हताश आहे. एनसीपी, काँग्रेसमधून भाजपमध्ये जे गेले होते ते आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस, एनसीपीतून भाजपमध्ये गेलेल्यांना रोखण्यासाठी सरकार पडणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत.

वाचा : अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीला शरद पवार हजर? राष्ट्रवादीने केला 'त्या' फोटोचा पर्दाफाश

काय म्हटले होते नारायण राणे

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार अशी राजकीय भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाहीये त्यामुळे तिथे तसं होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. मार्च महिन्यात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असा बदल दिसून येईल.

काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात

नारायण राणे पुढे म्हणाले, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जाहीरपणे गोष्टी गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल आणि मग भाजपचं सरकार येण्याची तारिखही पुढे जाईल.

First published:

Tags: BJP, Mumbai, Narayan rane, Nawab malik