मुंबई, 23 जुलै: 100 कोटी वसुली प्रकरणी वादात अडकलेले राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अॅड. जयश्री पाटील (adv Jayashree Patil) यांनी सुप्रीम कोर्टात (supreme court) कॅव्हेट दाखल केली आहे. याआधीही जयश्री पाटील यांच्या याचिकेमुळे देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. ईडीची पिडा टळावी यासाठी अनिल देशमुख उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयात धावाधाव करत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्या जयश्री पाटील आता पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या धावपळीला ब्रेक लावण्यासाठी मैदानात उतरल्या आहे. लिफ्टच्या बहाण्याने लुट; लोक दागिने, ATM करतात चोरांच्या स्वाधीन मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारची याचिका आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली. तपास हा योग्य होत आहे, असे निरीक्षण नोंदविल्यानंतर राज्य सरकार किंवा अनिल देशमुख सदर भ्रष्टाचार प्रकरण तपास थांबावा म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतील. त्यापूर्वीच त्यांना कोणताही दिलासा सुप्रीम कोर्टाकडून मिळू नये म्हणून जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा देशमुख यांना कोणताही मार्ग मिळू नये, असा प्रयत्न जयश्री पाटील यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आता जयश्री पाटील आणि अनिल देशमुख यांचा संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. कोण आहेत अॅड. जयश्री पाटील? अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचं नाव या प्रकरणापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणीदेखील चांगलंच चर्चेत आलं होतं. त्या स्वतः मराठा समाजातल्या आहेत. तरीही मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका ही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातूनच दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांनी विरोध केला होता. महिन्याभरात प्रियंका चोप्राने मुंबईतील 2 प्रॉपर्टी विकल्या; लाखो रुपयांना ऑफिसही हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टातही त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडलेली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या जयश्री पाटील या कन्या आहेत. मानवाधिकारांबाबत त्यांचं काम असून त्यांनी या विषयावर आधारित अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. तसंच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी भूमिका बजावलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.