जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / महिन्याभरात प्रियंका चोप्राने मुंबईतील 2 property विकल्या; लाखो रुपयांना ऑफिसही दिलं भाड्याने

महिन्याभरात प्रियंका चोप्राने मुंबईतील 2 property विकल्या; लाखो रुपयांना ऑफिसही दिलं भाड्याने

महिन्याभरात प्रियंका चोप्राने मुंबईतील 2 property विकल्या; लाखो रुपयांना ऑफिसही दिलं भाड्याने

अभिनयाशिवाय प्रियंकाकडे स्वतःचे काही ब्रँड्स आहेत. तर मुंबई, गोवा, न्यूयॉर्क याठिकाणी तिच्या अनेक प्रॉपर्टी आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 23 जुलै: अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) अभिनयाइतकीच तिच्या महत्वाकांक्षी प्रॉपर्टी (Property) आणि बिझनेस साठीही ओळखली जाते. अभिनयाशिवाय तिच्याकडे स्वतःचे काही ब्रँड्स आहेत. तर मुंबई, गोवा, न्यूयॉर्क याठिकाणी तिच्या अनेक प्रॉपर्टी आहेत. प्रियांकाने मुंबईतील ओशिवरा , अंधेरी भागात वास्तू प्रेसिंत येथील ऑफिस देखील लीसवर दिलं आहे. 2040 स्के फुटांच हे ऑफिस 2.11 लाख प्रती महिना दराने भाड्याने दिलं आहे. मिळालेल्या कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे. (Priyanka Chopra’s property in Mumbai)

जाहिरात

याशिवाय मुंबईतील (Mumbai) वर्सोवा भागातील दोन फ्लॅट्स (Residential Flats) देखील तिने मागच्याच महिन्यात विकले आहेत. राज क्लासिक वर्सोवा येथील 888 स्के फू फ्लॅट 3 कोटी रुपयांना विकला आहे. 9 लाख रुपये स्टँप ड्यूटी ही भरण्यात आली होती. नोंदवण्यात आलेल्या कागद पत्रांनुसार ही माहिती समोर आली आहे.

‘बिग बॉस’ फेम सोनाली राऊतचा बोल्ड अवतार; सोशल मीडियावर फोटो होतायत व्हायरल

याचं मजल्यावरील आणखी एक फ्लॅट प्रियंकाने विकला आहे. 1219 sq foot हा फ्लॅट 4 कोटी रुपयांना विकला गेला तर 12 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरण्यात आली होती. एकूण 7 कोटी रुपयांची प्रॉपर्टी प्रियंका चोप्राने विकली आहे. (Priyanka chopra sold Mumbai property)

प्रियांकाच्या याखेरीज मुंबई, गोवा आणि अमेरिकेतही अनेक प्रॉपर्टी आहेत. काहीच महिन्यांपूर्वी तिने अमेरिकेत सोना हे नव रेस्तरॉ (SONA restaurant) ओपन केलं आहे. ज्यात अनेक भारतीय पदार्थ मिळतात. अमेरिकेतील बेव्हेरली हिल्स (Beverly hills) या ठिकाणी आलिशान घर तिने खरेदी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात