नवी दिल्ली, 23 जुलै: कोरोना काळात उद्भवलेल्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यातही प्रामुख्याने चोरी, दरोडा यामध्ये मोठी वाढ झाल्याचं वारंवार येणाऱ्या बातम्यांवरुन समजते. मात्र गुन्हेगार प्रत्येकवेळी चोरीच्या नवनव्या कल्पना लढवत असल्याचं दिसतं. यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुम्ही कोणत्या सार्वजनिक वाहनाच्या प्रतिक्षेत उभे आहात. अचानक एक व्यक्ती येऊन तुमच्याशी बोलू लागते. यादरम्यान तुम्ही त्या व्यक्तीला आपल्याला कुठे जायचंय हेदेखील सांगता. त्यानंतर असं लक्षात येतं की, ती व्यक्ती व आपलं ठिकाण एकच आहे. थोळ्या वेळानंतर एक कार येथे येते आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं नेमक्या त्याच पत्त्यावर जाणार असल्याचं सांगते. चुकूनही अशा कारमधून प्रवास करू नका. अशा पद्धतीचा वापर करून त्या व्यक्तीकडून कॅश आणि ज्वेलरी चोरणारी गँग सक्रीय झाली आहे. ही गँग पिनचा क्रमांक विचारून एटीएममधून पैसेदेखील काढून घेते. पहिली घटना… मेघराज सिंह (61) कुटुंबासह विनोद नगर येथे राहतो. आयपी एक्सटेन्शन स्थित वंदना अपार्टमेंटच्या बाहेर टेलरचं काम करतो. तो 18 जुलै रोजी सायंकाळी 5.15 मिनिटांनी घरी जाण्यासाठी निघाला होता. बीएसईएस ऑफिसच्या समोर तो ई-रिक्षाची वाट पाहत होता. तेव्हा एक व्यक्ती आली आणि त्याला कुठे जायचं याबद्दल विचारू लागली. मेघराजने विनोद नगर असं उत्तर दिलं. थोड्या वेळाने कार आली, ज्या ड्रायव्हरने विनोद नगरचा रस्ता विचारला. यावेळी मेघराजच्या शेजारील व्यक्ती म्हणाली की, आम्हालाही तेथेच जायचं आहे. कारमध्ये आधीच तिघे जण बसले होते. जे म्हणाले की, ते क्राइम ब्रांन्चमधून आहेत आणि मर्डरचा तपास करण्यासाठी जात आहे. एक बॅग देत म्हणाले की, तुमच्याजवळ जे काही आहे ते यामध्ये ठेवा. मेघराजने पर्समधून 5300 रुपये आणि एटीएम कार्ड काढलं आणि त्यात ठेवलं. चोरांनी मेघराजकडून एटीएनचा पिनदेखील विचारून घेतला होता. यानंतर त्याला मयूर विहाराजवळ उतरविण्यात आलं आणि बॅगदेखील हातात दिली. उतरल्यानंतर त्याने बॅग चेक केली तर त्यात रद्दी होती. काही वेळानंतर मोबाइलवर एटीएममधून 3 हजार काढण्याचा मेसेज आला. यानंतर त्याने पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार केली. हे ही वाचा- पुण्यातील गारवा हॉटेल मालकाच्या हत्येचा खळबळजनक उलगडा; कोयत्याने केले वार दुसरी घटना.. सुनयना (48) सोनिया विहारमध्ये राहते आणि नोएडा येथील रुग्णालयात नोकरी करते. ती 5 जुलै सायंकाळी 4.30 वाजता रुग्णालयातून कोंडली स्टँडवर पोहोचली. एक आर्मी कट असलेला तरुण आणि महिला तेथे उभी होती. तरुणाने सुनयनाला कुठे जायचं याची माहिती घेतली. थोड्या वेळाने तेथे एक कार आली. ड्रायव्हरने सांगितलं की, तो सीआरपीएफमध्ये आहे आणि त्यांचा अधिकारी आनंद विहार येथे वाट पाहत आहे. यावर तरुणाने लिफ्ट देण्याची विनंती केली. ड्रायव्हरच्या हातात व्हायरलेट सेट होता. ज्यातून आवाज येत होता की, मर्डर झाला आहे लवकर पोहोचा. ड्रायव्हरने सांगितलं की, मर्डर झाला आहे आणि दोन महिला 14 लाख घेऊन पळाली आहेत. यासाठी सर्व सामान तरुणाकडे द्या. सुनयनाने सोन्याच्या बांगड्या आणि गोल्ड चेन, डेबिल कार्ड त्याच्याकडे दिलं. शिवाय पिनदेखील विचारून घेतला. एका बॅगमध्ये सर्व वस्तू ठेवल्या. जेव्हा सुनयना गाडीतून खाली उतरली तेव्हा तिच्या हातात दिलेल्या बँगमध्ये खोटे दागिने होते. शिवाय तिच्या एटीएममधून 25000 रुपये काढल्याचा मेसेजदेखील आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







