मुंबई, 28 मे : जालन्यातील (Jalna) भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणी (BJP workers beaten by police) संदर्भात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. Fadanvis wrote letter to CM
(वाचा-चंद्रकांत पाटलांना स्वप्न पाहण्याचा छंद! सरकार पाडापाडीवर जयंत पाटलांची टीका)
जालन्यात हॉस्पिटलमध्ये धुडगूस सुरू असल्यामुळं कारवाईसाठी आलेले पोलिस हे एका समाजाबाबद अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत होते. पोलिस करत असलेली शिविगाळ जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयालवाले यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केली होती. त्यावर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांना अत्यंत बेदम अशी मारहाण केल्याचं पाहायला मिळालं. या घटनेच्या जवळपास दीड महिन्यांनंतर हा व्हिडिओ समोर आला.
(वाचा-बुलडाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस-गारपीट, घरांची छपरं उडाली, अनेकांचे मोठे नुकसान)
नारीयलवाले यांचा या प्रकरणात कुठंही प्रत्यक्ष संबंध नव्हता. त्यांनी फक्त पोलिसांनी क्लिप तयार केल्यानं त्यांना ही शिक्षा देण्यात आली. पण ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण आहे त्यांनीच अशी मारहाण करणं धक्कादायक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. या मारहाणीमद्ये डीवायएसपी पदाचे अधिकाही सहभागी होते. पण हे डीवायएसपी लाच प्रकरणात निलंबित झाल्यानं हे प्रकरण समोर आलं. पोलिसांनी शिविगाळ केल्याची क्लिप बाहेर न आणण्याची धमकी नारीयलवाले यांना दिली होती. पण तब्बल दीड महिन्याने हा प्रकार समोर आला. तोवर हे कुटुंब प्रचंड धास्तीत होतं, असंही फडणवीस यांनी लिहिलं आहे.
राज्यातील या घटना म्हणजे राज्यात कायद्याचं राज्य नसणं असं फडणवीस म्हणाले. त्यात सरकारनं यावर बाळगलेलं मौन म्हणजे अधिक गंभीर बाब आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.