जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Buldana Rain वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अनेक घरांची छपरं उडाली, अचानकच्या पावसानं उडाली दाणादाण

Buldana Rain वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अनेक घरांची छपरं उडाली, अचानकच्या पावसानं उडाली दाणादाण

प्रतिकात्मक फोटो.

प्रतिकात्मक फोटो.

Rain in buldana अचानक आलेल्या या पवासामुळं अनेकांची तारांबळ उडाली. अनेकांना वादळी वाऱ्याचाही फटका बसला आहे. तसंच गारपीट झाल्यानं आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

बुलडाणा, 28 मे : जिल्ह्यात शुक्रवारी अचानक अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं. शेगाव, संग्रामपूर, वरवंट, खामगाव या ठिकाणी पावसानं (Heavy Rain) दमदार हजेरी लावली. मात्र अचानक आलेल्या या पवासामुळं अनेकांची तारांबळ उडाली. अनेकांना वादळी वाऱ्याचाही फटका बसला आहे. तसंच गारपीट झाल्यानं आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. (वाचा- Big News :..तर मराठा समाजासाठी नवा पक्ष स्थापन करणार,छत्रपती संभाजीराजांचे संकेत ) बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार उडवून दिला. शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं अनेकांची घराची छपरं उडून गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं अनेकजण बेघर झाले आहेत. प्रामुख्यानं बुलडाण्याचील शेगाव, संग्रामपूर, खामगाव याठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याची माहितीही समोर येत आहे. जिल्ह्यात अचानक अशा प्रकारे अवकाळी पाऊस पडल्यानं अनेकांची धावपळ उडाली.

जाहिरात

यास चक्रीवादळाचा परिमाण म्हणून विदर्भामध्ये काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती. ओरिसाच्या किनाऱ्यावर पुढं सरकलेल्या या चक्रीवादळाचा परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण त्यामुळं राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली नव्हती. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला होता. पण अचानक आलेल्या अवकाळी पावसानं सगळ्यांचीच दाणादाण उडाली. (वाचा- अच्छे दिनच्या हार्दिक शुभेच्छा! पेट्रोलच्या शंभरीनंतर राष्ट्रवादीची पोस्टरबाजी ) दरम्यान, विदर्भात पुढचे आणखी तीन चार दिवस तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे तीस तारखेनंतरही विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात हळू हळू वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमरावती हवामान विभागातील प्रमुख अनिल बंड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात