मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अनेक आमदार संपर्कात, देवेंद्र फडणवीस यांनी दिले मेगाभरतीचे संकेत

अनेक आमदार संपर्कात, देवेंद्र फडणवीस यांनी दिले मेगाभरतीचे संकेत

'एखादे सरकार धोक्याने आले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही हे सर्वांना माहिती आहे. आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे'

'एखादे सरकार धोक्याने आले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही हे सर्वांना माहिती आहे. आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे'

'एखादे सरकार धोक्याने आले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही हे सर्वांना माहिती आहे. आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे'

मुंबई, 21 डिसेंबर :  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेशानंतर आणखी भाजप नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आता महाविकास आघाडीमधीलच काही नेते आणि आमदार संपर्कात असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा फडणवीस यांनी केला आहे.

नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलत असता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये मेगाभरतीचे संकेत दिले आहे.

प्रॉपर्टी डिलरची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या, पाहा धक्कादायक VIDEO

'नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे तिथून भविष्यात आपला खासदार तिथून निवडून येणार आहे. पुढील काही काळात अनेक आमदार आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण काही लोकं उगाच वावड्या उठवत असतात की, भाजपचे नेते आमच्याकडे येणार आहे. पण, मुळात त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी ते अशा पुंग्या सोडत असतात. पण, त्यात काहीही तथ्य नाही. आमचे सर्व आमदार एकाच ठिकाणी आहे' असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

तसंच, 'भाजपमध्ये जे बाहेरून नेते आले आहे, त्यांनी मोठे राजकारण पाहिले आहे. त्यांना चांगले समजते की, या देशाचे भवितव्य हे राहुल गांधी नाही, सोनिया गांधी नाही आणि यूपीए सरकार सुद्धा नाही. देशाचे भवितव्य फक्त नरेंद्र मोदी हेच आहे' असंही फडणवीस म्हणाले.

'एखादे सरकार धोक्याने आले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही हे सर्वांना माहिती आहे. आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. त्यामुळे जी राजकीय जागा निर्माण होईल, त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. एखाद्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला असेल पण आगामी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे', असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुंबईतील नरिमन पाँईट येथील भाजपच्या मुख्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप हे आधीपासूनच भाजपमध्ये होते. ते फक्त आपल्यापासून काही काळ दूर गेले होते. पण, आता ते परत आले आहे.  बाळासाहेब कुठल्याही जबाबदारी पेलू शकतात.  त्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल. सानप यांच्या येण्यामुळे पक्ष मजबूत होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

First published:
top videos

    Tags: BJP, NCP, Shivsena