मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'लूज बॉल आला की फटका मारायचाच, पण...' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग

'लूज बॉल आला की फटका मारायचाच, पण...' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग

'माझी आठवण फक्त इथल्या धावपट्टीसोबत आहे क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनलंय. मलाही वाटायचं क्रिकेटर व्हावं. पण होवू शकलो नाही'

'माझी आठवण फक्त इथल्या धावपट्टीसोबत आहे क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनलंय. मलाही वाटायचं क्रिकेटर व्हावं. पण होवू शकलो नाही'

'माझी आठवण फक्त इथल्या धावपट्टीसोबत आहे क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनलंय. मलाही वाटायचं क्रिकेटर व्हावं. पण होवू शकलो नाही'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 29 ऑक्टोबर :  'लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो की किंवा राजकारणात असो. पण फटका मारताना विकेटही टाकायची नाही' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium)  पार पडलेल्या कार्यक्रमात जोरदार बॅटिंग केली. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वादावरून नाराजी व्यक्त केली. वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे "द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स" आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियममधील नॉर्थ स्टँडचे "दिलीप वेंगसरकर स्टँड" असं नामकरण करण्यात आलं. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देत राजकीय टोलेबाजीही केली. भेटा LIVER KING ला! 20 वर्षांपासून जगतोय आदिमानवासारखं जीवन, खातो कच्चं मांस इकडच्या बाजूंनी बॉलरने टाकलेले स्विंग चांगले कळतात. त्यामुळं समोरचे स्विंग चांगले कळतात. मी आता मैदानात उतरलोय, तेही जगविख्यात संघातून. माझी आठवण फक्त इथल्या धावपट्टीसोबत आहे क्रिकेट जनतेच्या रक्तात भिनलंय. मलाही वाटायचं क्रिकेटर व्हावं. पण होवू शकलो नाही, अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली. तसंच, 'लूज बॉल आला की फटका मारायचाच. तो क्रिकेटमध्ये असो की किंवा राजकारणात असो. पण फटका मारताना विकेटही टाकायची नाही' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. खेळाडूंवरील आरोप अशोभनीय -शरद पवार तर 'उत्तम क्रिकेटर हा उत्तम प्रशासक असेलच असं नाही. पण याला माधव मंत्री अपवाद होते. चांगल्या मॅचेस पाहण्यासाठी मी पुण्याहून इथं यायचो. ई स्टँडला बसणाऱ्या लोकांना सर्वाधिक क्रिकेट समजते. गरवारे आणि एमसीएचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. मी गरवारेकडून व मनोहर जोशी एमसीएकडून प्रतिनिधी होतो. पण दोघांनी मिळून हा वाद सोडवला, असं म्हणत पवारांनी आठवणींना उजाळा दिला. 'अल्गोरिदम आणि इतर प्रक्रियांची माहिती द्या',सरकारने Facebook कडे मागितली माहिती द.आफ्रिका वर्ल्ड कपसाठी कप्तानपदाचा शोध सुरू होता. सचिन तेंडुलकरने महेंद्रसिंग धोनीचे कप्तानपदासाठी नाव सुचवले आणि तो यशस्वितेचा विश्वासही दिला. सचिनला ही जबाबदारी घेण्याची संधी होती. परंतु, स्वत:चा विचार न करता त्यांनी क्रिकेटचा विचार करत धोनीचे नाव सुचवले' असा किस्साही पवारांनी सांगितला. 'अलीकडे झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात आपल्या संघाला पराभव आला. पण पाकविरोधात हरल्यानंतर काही खेळांडूविरोधात प्रतिक्रिया उमटल्या. त्या अशोभनीय होत्या. उद्याची मॅच आपण नक्की जिंकू, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. अमृता फडणवीस यांचं आलं नवीन गाणं, सोनू निगमने लावला सूर, VIDEO एमसीएचे काही प्रश्न सोडवण्यासाठी सीएम यांची नक्की मदत होईल अशी अपेक्षा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना क्रिकेटची आस्था असल्यानं त्यांचे नाव इथल्या प्रेस बॉक्स दिलंय, असंही पवारांनी आवर्जून सांगितलं. आशिष शेलार आलेच नाही! दरम्यान,  वानखेडे स्टेडियममधील शानदार सोहळ्याला मानापमान नाट्याचं गालबोट लागलं आहे.  भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यासपीठावर जागा न मिळाल्यामुळे ते नाराज होऊ कार्यक्रमाला हजरच राहिले नाही. भाजपचे आमदार आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनचे सदस्य आशिष शेलार यांना आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण असूनही ते गैरहजर राहिले. आजच्या या सोहळ्याला भाजप पक्षाकडून फक्त आशिष शेलार यांनाच निमंत्रण होतं. मात्र, मान्यवरांच्या मुख्य स्टेजवर बसण्यास मानाची जागा मिळाली नाही म्हणून आशिष शेलार नाराज होते. त्यामुळेच ते आजच्या सोहळ्यास अनुपस्थित राहिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, यावेळी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर यांच्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार जी. आर. विश्वनाथ, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी  रश्मी ठाकरे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, उपाध्यक्ष अमोल काळे, सचिव संजय नाईक, सहसचिव शाहआलम शेख, खजिनदार जगदिश आचरेकर, टी २०- गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
First published:

पुढील बातम्या