मुंबई, 29 ऑक्टोबर : आपल्या युनिक आवाजामुळे आणि या ना त्या मुद्यावरून शिवसेनेवर (Shivsena) टीका करणाऱ्या भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी दिवाळीच्या निमित्ताने आणखी एक गाणं सादर केलं आहे. विशेष म्हणजे, यावेळी अमृता यांच्यासोबत गायक सोनू निगमनेही सूर लगावला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर, तर कधी कधी सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर केली आहे. यावेळी दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी महालक्ष्मी आरती गीत सादर केले आहे. महालक्ष्मीजी की आरती, जो कोई नर गाता, उर आनंद समाता, पाप उतर जाता ! ॐ जय लक्ष्मी माता! असं या गाण्याचं नाव आहे.
Wishing all the listeners of Times Music Spiritual, a very Happy and prosperous Diwali. Listen to my special Diwali release, 'Om Jai Lakshmi Mata' with the very talented Sonu Nigam ji
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 29, 2021
👉 https://t.co/BqpOoIFz7B
Have a safe Diwali !@TimesMusicHub
#Diwali #Laxmi #Aarti pic.twitter.com/37HXba6V3L
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून हे गाणं लाँच केलं आहे. या गाण्यात लोकप्रिय गायक सोनू निगमची खास उपस्थितीत आहे. या गाण्यातून पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांनी सोनू निगमसोबत गाणं गायलं आहे. Vastu Tips for Diwali 2021 : ‘या’ गोष्टी नक्की करा म्हणजे लक्ष्मी येईल घरा याआधीही अमृता फडणवीस यांची अनेक गाणी आली. गणपती, व्हेलटाईंन डेच्या निमित्ताने त्यांनी अशी गाणी सादर केली आहे. अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ‘फिर से’ या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं होतं.

)







