मुंबई 26 जून: राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे करोनावर (covid-19) मात करून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या ते आपल्या घरी क्वारंटाइन आहेत. मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach candy hospital Mumbai) त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या काळातल्या आठवणींना उजाळा देतांना ते म्हणाले, हा कसोटीचा काळ होता. त्या काळात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी फोन करून मला धीर दिला. त्यांचे 4, 5 वेळा फोन आले होते. पंकजांनी फोन केल्याने आनंद वाटल्याची भावनाही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना व्यक्त केली.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, अवघड काळात असा धीर महत्त्वाचा असतो. मला काहीच होणार नाही हा आत्मविश्वास मला नडला. या काळात सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. या कठीण काळात आईने धीर दिला. मुलींनी समजून घेतलं त्यामुळे आणखी बळ मिळालं. अशा काळात आत्मविश्वास ठेवला पाहिजे.
कोरोनावर मात करता येते हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र प्रत्येकाने काळजी घेतलच पाहिजे. गरज असेल तर घराबाहेर पडलं पाहिजे. या काळात मी नव्याने जगायला शिकलो असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका 50 टक्के जास्त असतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हाती आलेल्या आकडेवारी नुसार, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 75 टक्के लोकांना इतर आजार असून मधुमेह असलेल्या रुग्णांना सर्वाधिक जास्त प्रमाण आहे.
या राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राजधानीत 15 दिवसांचा पूर्ण Lockdown!
भारतातील 11 पैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. जगातील 16.6 टक्के मधुमेह रुग्ण भारतात आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ डायबेटिसच्या मते मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिकारशक्ती कमी असते. केवळ कोरोनाच नाही तर इतर रोगांचा धोकाही जास्त आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Plasma Therapy चा कोरोना रुग्णांवर काय होतोय परिणाम? CMनी दिली महत्त्वाची माहिती
दिल्ली एम्सचे ज्येष्ठ डॉक्टर राकेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुमेहाचा रुग्ण कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कात आला तर त्यांच्यावर साथीच्या रोगाचा परिणाम जीवघेणा होऊ शकतो. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अहवाल तपासाला असता या संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 75 टक्के लोकांमध्ये इतर रोग देखील आढळले आहेत.
संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhananjay munde, Pankaja munde