मराठी बातम्या /बातम्या /देश /

या राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राजधानीत 15 दिवसांचा पूर्ण Lockdown!

या राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, राजधानीत 15 दिवसांचा पूर्ण Lockdown!

राजधानी गुवाहाटीत 15 जूनपासून तब्बल 700 नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 133 जणांची नव्याने भर पडली त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

राजधानी गुवाहाटीत 15 जूनपासून तब्बल 700 नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 133 जणांची नव्याने भर पडली त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

राजधानी गुवाहाटीत 15 जूनपासून तब्बल 700 नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 133 जणांची नव्याने भर पडली त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

नवी दिल्ली 26 जून: आसाममध्ये (Assam) कोरोना व्हायरसने (Coronvirus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राजधानी गुवाहाटीत (Guwahati) सरकारने पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू होईल. त 15 दिवसांचा असेल. रविवारपर्यंत जनतेने गरजेच्या सर्व वस्तू खरेदी करून ठेवाव्यात असं आवाहन आरोग्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा (Assam Health Minister Himanta Biswa Sarma) यांनी केलं आहे. सर्व कामरुप जिल्ह्यात हा लॉकडाऊन राहणार आहे. हॉस्पिटल्स आणि मेडिकल दुकांनांनाच फक्त सुरू ठेवण्याची परवानगी आहे. बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत. रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व राज्यात संचारबंदी राहणार आहे. राजधानी गुवाहाटीत 15 जूनपासून तब्बल 700 नवे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी 133 जणांची नव्याने भर पडली त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे.  मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसचा धोका 50 टक्के जास्त असतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून हाती आलेल्या आकडेवारी नुसार, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या 75 टक्के लोकांना इतर आजार असून मधुमेह असलेल्या रुग्णांना सर्वाधिक जास्त प्रमाण आहे. Plasma Therapy चा कोरोना रुग्णांवर काय होतोय परिणाम? CMनी दिली महत्त्वाची माहिती भारतातील 11 पैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. जगातील 16.6 टक्के मधुमेह रुग्ण भारतात आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ डायबेटिसच्या मते मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिकारशक्ती कमी असते. केवळ कोरोनाच नाही तर इतर रोगांचा धोकाही जास्त आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. '6 फुटांचं अंतर आणि मास्क जरुरी' आता लग्नपत्रिकेवरही कोरोनाचा मेसेज दिल्ली एम्सचे ज्येष्ठ डॉक्टर राकेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मधुमेहाचा रुग्ण कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कात आला तर त्यांच्यावर साथीच्या रोगाचा परिणाम जीवघेणा होऊ शकतो.  कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अहवाल तपासाला असता  या संक्रमणामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 75 टक्के लोकांमध्ये इतर रोग देखील आढळले आहेत.ार संपादन - अजय कौटिकवार  
First published:

Tags: Assam, Coronavirus

पुढील बातम्या