नवी दिल्ली, 26 जून : कोरोना रुग्णांसाठी (corona patient) प्लाझ्मा थेरेपी (Plasma Therapy) आता आशेचा किरण ठरताना दिसत आहे. कोरोनाची लागण झालेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी होताना दिसली. आता इतर कोरोना रुग्णांवरही या थेरेपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm kejriwal) यांनी कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा थेरेपीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दर 50 टक्के कमी झाला आहे. मात्र ही थेरेपी मॉडरेट रुग्ण म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांवरच परिणामकारक ठरत आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. हे वाचा - ‘या’ राज्यामध्ये दोन आठवड्यांसाठी वाढला लॉकडाऊन, लागू होणार कर्फ्यू केजरीवाल यांनी सांगितलं, सध्या एलएनजेपी आणि राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात प्लाझ्मा थेरेपीने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी मिळाली आहे. LNJP रुग्णालयात सर्वात आधी कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीने उपचार केले. या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. मृत्यूचा दर 50 टक्के कमी झाला आहे. ही थेरेपी मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांवर जास्त परिणामकारक आहे. अति गंभीर कोरोना रुग्णांना या थेरेपीमार्फत वाचवणं कठीण आहे, असंही ते म्हणाले. हे वाचा - ‘6 फुटांचं अंतर आणि मास्क जरुरी’ आता लग्नपत्रिकेवरही कोरोनाचा मेसेज दरम्यान दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांच्यावरही प्लाझ्मा थेरेपी यशस्वी होत असल्याचं दिसलं. या थेरेपीनंतर 24 तासांतच ते आयसीयूमधून बाहेर आले. त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे काय आहे प्लाझ्मा थेरपी? डॉक्टरांनी सांगितलं की, जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं. हे वाचा - कोरोनावरील ‘त्या’ औषधावर बंदी आणा, अमोल कोल्हेंची केंद्राकडे मागणी दिल्लीतील एम्सचे रणदीप गुलेरिया म्हणाले, “कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीद रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील” संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.