मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईतील ग्रांट रोडमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 मॉडेल्सची सुटका

मुंबईतील ग्रांट रोडमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 मॉडेल्सची सुटका

ग्रांड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.

ग्रांड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.

ग्रांड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.

मुंबई, 27 मे : मुंबईतील (Mumbai) ग्रांट रोड (Grant road) परिसरात मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा (sex racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका केली आहे. या दोन्ही तरुणी मॉडेल (models ) असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण शासकीय नियम धाब्यावर बसून हॉटेल्समध्ये अवैध धंदे सुरूच आहे. मुंबईतील ग्रांड रोड परिसरात एका थ्री स्टार हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

WhatsApp ला केंद्र सरकारचं उत्तर! प्रायव्हसीचा सन्मान पण...

ग्रांड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दलाल महिलेला रंगेहाथ पकडले.

JEE Advanced 2021 प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली आहे. या दोन्ही मॉडेल असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही तरुणींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी  pita अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

ड्रग्स तस्कर चालवतात सेक्स रॅकेट

दरम्यान, मागील महिन्यात  एनसीबीच्या तपासात ड्रग्ज तस्कर सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील ड्रग्ज तस्कर लोकांना ड्रग्जचा पुरवठा करण्यासोबतच सेक्स रॅकेट (Sex Racket)ही चालवतात,  हा धक्कादायक खुलासा अटक करण्यात आलेल्या डोंगरीतील लेडी डॉन अशी ओळख असलेली आणि ड्रग्ज तस्कर इकरा कुरेशीने केला होता.

लढा मराठा आरक्षणाचा, संभाजीराजे घेणार आज शरद पवारांची भेट

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इकरा कुरेशी महिलांची एक टोळी चालवते. तिने मुंबईतील डान्स बार आणि पबमध्ये काम करणाऱ्या 8 ते 10 महिलांची एक टोळी तयार केली आहे. या टोळीत सामील असलेल्या महिला लोकांना खूपच सहज ड्रग्जचा पुरवठा करत असत. इतकेच नाही तर ड्रग्ज विकत घेणारा ग्राहक त्यांच्याकडे सेक्सची मागणी करत असत. त्यानंतर या महिला ती मागणी सुद्धा पूर्ण करत असत. यासाठी त्या ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे सुद्धा घेत असत. इकरा कुरेशी आणि तिची टोळी या गोरखधंद्यासाठी डान्स बार आणि पब यांची निवड करत असे. जेणेकरुन पोलिसांना किंवा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय येणार नाही. इकराच्या आणखी काही ठिकाणांबाबत एनसीबीला माहिती मिळाली, असून त्या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Sex racket