मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JEE Advanced प्रवेश परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट

JEE Advanced प्रवेश परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट

JEE Advanced 2021 Postponed : कोरोनामुळे आतापर्यंत परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

JEE Advanced 2021 Postponed : कोरोनामुळे आतापर्यंत परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

JEE Advanced 2021 Postponed : कोरोनामुळे आतापर्यंत परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 27 मे: सध्या देश कोरोना व्हायरससारख्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखताना दिसत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रकोप पाहता IIT प्रवेश परीक्षा JEE Advanced स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान ही परीक्षा कधी घेण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही आहे.

3 जुलै रोजी जेईई अॅडव्हांस 2021 परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र अनेक राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे यावर्षी जेईई मेन परीक्षही देखील घेतली नाही.

सध्याच्या कोरोनासारख्या महामारीची परिस्थिती लक्षात घेता JEE (अॅडव्हांस ) 2021 परीक्षा जी 03 जुलै, 2021 (शनिवारी) घेतली जाणार होती. ती स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा योग्य वेळी करण्यात येईल, असं अधिकृत सूचनेत सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात.

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे JEE (Main) मेन 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced 2021 परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना JEE Mains 2021 परीक्षा द्यावी लागते. यंदा 4 सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत देण्यात आली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र या परीक्षांना यंदा स्थगित केलं आहे. दरम्यान एप्रिलमध्ये होणारी JEE मेन परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता JEE अ‍ॅडव्हान्सही पुढे ढकलण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Entrance exam