मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /लढा मराठा आरक्षणाचा, संभाजीराजे घेणार आज शरद पवारांची भेट

लढा मराठा आरक्षणाचा, संभाजीराजे घेणार आज शरद पवारांची भेट

राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत पुढे काय करायचं, याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे.

राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत पुढे काय करायचं, याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे.

राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत पुढे काय करायचं, याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे.

मुंबई, 27 मे : मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे (Sambhaji raje) मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. आज ते राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण मुद्दावर आज खासदार छत्रपती संभाजीराजे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहे. मुंबईत पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी खासदर संभाजीराजे सकाळी भेट घेतील अशी माहिती आहे.  मागील काही दिवसात सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर रस्तावर येत मोर्चा, आंदोलन करण्याची भाषा काही मराठा संघटना करत आहेत.  त्याचवेळी न्यायालय लढाई सरकार पातळीवर लढली जाणार आहे. या सर्व गोष्टीवर पवार आणि संभाजी राजे यांच्यात आज चर्चा होईल.

JEE Advanced 2021 प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

विशेष म्हणजे,  बुधवारीच शरद पवार अणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट झाली. या भेटी दरम्यान मराठा आरक्षण आणि आंदोलन स्थिती यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.  शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहे.

चाळीशीनंतरही राहायचं आहे Fit and Fine; पुरुषांसाठी खास Diet plan

राजकीय नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबत पुढे काय करायचं, याबद्दल आपली भूमिका मांडणार आहे. त्यामुळे या भेटींकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

First published:
top videos