Home /News /mumbai /

पूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता

पूरग्रस्तांना उद्या मिळणार मोठा दिलासा, विशेष पॅकेजच्या घोषणेची शक्यता

राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने नुकताच वर्तवला आहे.

    मुंबई, 27 जुलै: राज्यावर आलेल्या अस्मानी संकटावर (Maharashtra flo0d) लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Government cabinet meeting) पार पडणार आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत विशेष पॅकेजची (Flood relief package) घोषणा होण्याची शक्यता आहे. बुधवारी 28 तारखेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. उद्याची बैठक प्रदीर्घ असणार आहे. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसानीच सादरीकरण होणार आहे. प्रत्येक विभागाकडून नुकसानीची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आपत्तीग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. Video: ‘माझ्याशी वाकडं नदीवर लाकडं’; ‘Devmanus’ झाला चंदाच्या हातचं खेळणं दरम्यान, राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने नुकताच वर्तवला आहे. यात कोकणातील रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली , कोल्हापूरआणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा  समावेश आहे. पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश आहे. मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले की, अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. घरांची, मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे. वारंवार घडणार्‍या या घटनांचा विचार करता शासन मदत करणारच आहे, पण यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना करायच्या यावरही विचार सुरू आहे. कोकण हा इको सेंसेटिव्ह झोन जाहीर करण्याची शिफारस गाडगीळ समितीने केली आहे, त्यामुळे नैसर्गिक वैभवाला छेडछाड केली तर असे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कटू निर्णय घेण्याची गरज मला तरी वाटते. आता नुकसानग्रस्तांना काय मदत करता येईल याबाबत आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा आहे. बीड हादरलं! प्रेम प्रकरणातून नर्सची तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेची आत्महत्या एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम वेळेवर पोहचल्या नाहीत अशा तक्रारी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरुपी टीम तैनात केल्या पाहिजेत असा विचार आहे. जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन केंद्र बळकट करणे, शेतीचं नुकसान झालं आहे, रस्ते वीजेचे नुकसान झालंय या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावं, पूर रेषेत असलेले गावं यांचं पुनर्वसन करणं याबाबतही चर्चा होणार आहे. या सगळ्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आधी बैठक होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर संध्याकाळी चर्चा होणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Cm, Maharashtra, Mumbai, Uddhav thackarey

    पुढील बातम्या