• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बीड हादरलं ! प्रेम प्रकरणातून नर्सची आत्महत्या तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेने संपवलं आयुष्य

बीड हादरलं ! प्रेम प्रकरणातून नर्सची आत्महत्या तर हुंड्याच्या जाचामुळे विवाहितेने संपवलं आयुष्य

प्रेम प्रकरणामुळे 26 वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेतला तर दुसऱ्या घटनेत हुंड्याच्या जाचामुळे (Dowry harassment) विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले आहे.

  • Share this:
बीड, 27 जुलै : बीड जिल्ह्यात (Beed district) तरुणी आणि विवाहातेच्या आत्महत्येने (married woman suicide) खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणामुळे 26 वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेतला तर दुसऱ्या घटनेत हुंड्याच्या जाचामुळे (Dowry harassment) विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले आहे. मांजरसुंबा घाटात एका नर्सने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल उघडकीस आली होती. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात मयत नर्सच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रेम प्रकरणातूनच तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बीड शहरातील शिवाजीनगर येथील सोनाली अंकुश जाधव या नर्सने काल मांजरसुंबा घाटात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अक्षय राजाभाऊ आव्हाड याचे आणि मयत सोनालीचे प्रेमसंबंध होते. सोनाली वारंवार अक्षय आव्हाडला माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत होती. मात्र अक्षयचे यापुर्वीच लग्न झालेले असल्याने तो लग्न करण्यास तयार नव्हता. या नैराश्यातूनच सोनालीने आत्महत्या केली असून या आत्महत्येला आरोपी अक्षय राजाभाऊ आव्हाड हा जबाबदार आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. महिलांवर अश्लील शेरेबाजी करत वृद्धानं गावाला आणला वैताग; तरुणानं आयुष्यभराची घडवली अद्दल दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील शेकटा येथील अवघे आठ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेला घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळीनी तिचा अतोनात छळ केला. गर्भपात करण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे. छळ असह्य झाल्याने अखेर त्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मोनिका भीमाशंकर भारती असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. मोनिकाचे वडील दत्ता राजाराम गिरी यांच्या फिर्यादीनुसार पतीसह दिर, जाऊ आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिकाचा विवाह आठ महिन्यापूर्वी भीमाशंकर नारायण भारती याच्यासोबत झाला होता. सुरुवातीचे चार-पाच महिने चांगले गेल्यानंतर घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेऊन ये अशी मागणी करत पती भीमाशंकर, दिर राहुल, जाऊ मीनाक्षी आणि सासू संजीवनी या चौघांनी मोनिकाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु केला. तिला मारहाण करून उपाशी ठेवण्यात येत असे मोनिकाच्या वडिलांनी सांगितले. मोनिका गर्भवती राहिली असता तिच्या पतीन्ने आत्ताच मूल नको म्हणून गर्भपातासाठी तिच्यावर दबाव टाकला. अखेर सततच्या छळास कंटाळलेल्या चार महिन्याच्या गर्भवती मोनिकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मोनिकाचा पती, दिर, जाऊ आणि सासूवर गेवराई पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त नोंदविण्यात केल्याचा गुन्हा आला.
Published by:Sunil Desale
First published: