मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आधी सुसाइड नोट लिहून घेतली मग दिला भंयकर मृत्यू; महिलेच्या हत्येनं मुंबई हादरली!

आधी सुसाइड नोट लिहून घेतली मग दिला भंयकर मृत्यू; महिलेच्या हत्येनं मुंबई हादरली!

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Mumbai: एका महिलेला सुसाइड नोट लिहायला भाग पाडून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

नवी मुंबई, 30 ऑक्टोबर: एका महिलेला सुसाइड नोट लिहायला भाग पाडून (Forced to write suicide note) तिची हत्या (Murder in new mumbai) केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपीनं महिलेची हत्या करून तिने आत्महत्या केल्याचं दर्शवण्याचा प्रयत्न (Murdered and plot as suicide) केला. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत, त्याची कसून चौकशी केली असता आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या तोंडून हत्येचा घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

समाधान लांडवे असं अटक केलेल्या 38 वर्षीय आरोपीचं नाव असून तो एका बँकेत नोकरीस आहे. तर शितल निकम असं हत्या झालेल्या 36 वर्षीय महिलेचं नाव आहे. आरोपी लांडवे याने काही दिवसांपूर्वी मृत शितल निकम यांच्या पतीला वैयक्तिक 6.5 लाख रुपयांचं कर्ज दिलं होतं. पण अचानक लॉकडाऊन जारी केल्याने निकम यांचे पती आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे त्यांना कर्जाचे हफ्ता भरता आले नाहीत. निकम यांचे पती कर्जाचे हफ्ते भरत नसल्याने लांडवे याच्यावर देखील दबाव वाढला होता.

हेही वाचा-आधी पार्टी केली मग कुदळ मारून मित्राचा काढला काटा; नागपुरात आणखी एक हत्येचा थरार

यामुळे 21 ऑक्टोबर रोजी आरोपी लांडवे हा शितल निकम यांना भेटायला गेला होता. यावेळी कर्जाचे हफ्ते देण्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी आरोपी लांडवे याने निकम यांना म्हटलं की, 'एकतर मला पैसे दे, नाहीतर मरून जा.'  यावेळी निकम यांनी 'मी मरेन' असं लांडवे यांना सांगितलं. यावर लांडवे याने 'मरण्यापूर्वी सुसाइड नोट लिही' असं सुचवलं.' पण पुढे काय होणार याची जराशीही कल्पना नसणाऱ्या शीतल यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात सुसाइड नोट लिहिली.

हेही वाचा-अजबच! तरुणाने प्रेयसीच्या घरी मारला डल्ला; चोरीचं कारण ऐकून पोलीसही हैराण

यानंतर आरोपीनं साडीने गळा आवळून शीतल यांची हत्या केली. तसेच शीतल यांनी आत्महत्या केली असल्याचं भासवण्यासाठी आरोपीने शीतल यांचा मृतदेह पंख्याला लटकवण्याचा प्रयत्न केला. पण पंख्याचा ब्लेड तुटल्याने त्याचा शीतल यांना लटकवता आलं नाही. त्यामुळे घाबरलेल्या लांडवे याने शीतल यांचा मृतदेह बेडवर टाकून घटनास्थळावरून पळ काढला. सुसाइड नोटमुळे प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेत काहीतरी काळंबेर असल्याचा संशय रबाळे पोलिसांना होता.

हेही वाचा-झोपेतच पत्नीला संपवलं;काही तासात भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना

याप्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, आरोपी लांडवे आणि मृत निकम यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत, खडसावून चौकशी केली असता, आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Mumbai, Murder