Home /News /nagpur /

आधी पार्टी केली मग कुदळ मारून मित्राचा काढला काटा; नागपुरात आणखी एक हत्येचा थरार

आधी पार्टी केली मग कुदळ मारून मित्राचा काढला काटा; नागपुरात आणखी एक हत्येचा थरार

Murder in Nagpur: आरोपी तरुणाने दारूपार्टी केल्यानंतर आपल्या मित्रावर कुदळने जबरी वार करत त्याची हत्या (Brutal murder by stabbing with mattock) केली आहे.

    नागपूर, 30 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांत नागपुरात हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करूनही हत्यासत्र थांबायचं नाव घेत नाहीये. अशात गुरुवारी रात्री नागपुरात एका तरुणाने आपल्या मित्रांची निर्घृण पद्धतीने हत्या (Young man killed friend) केली आहे. आरोपी तरुणाने दारूपार्टी केल्यानंतर आपल्या मित्रावर कुदळने जबरी वार करत त्याची हत्या केली (Brutal murder by stabbing with mattock) आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका दुकानासमोर मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. कमलेश गिरडे असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पारडी परिसरातील एकता नगर येथील रहिवासी आहे. मृत कमलेश हा मजूर असून तो मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. तो अनेकदा आपल्या घरी जायचा नाही. बाहेरच मिळेल तिथे मुक्काम ठोकायचा. दरम्यान, गुरुवारी नेहमीप्रमाणे तो कामासाठी घरातून बाहेर गेला. नागपुरातील महाल परिसरातील एका बांधकामाच्या इमारतीवर तो कामासाठी गेला होता. हेही वाचा-दिपावलीच्या तोंडावरच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं; बीडमधील हृदय पिळवटणारी घटना दिवसभर काम केल्यानंतर, सायंकाळी तो आपल्या काही सहकारी मित्रासोबत घराकडे निघाला. मात्र तो घरी पोहोचलाच नाही. त्याचा मित्र आणि सहकारी दोघांनी घटनेच्या दिवशी रात्री एकत्र बसून पार्टी केली. यानंतर पैशावरून दोघांत वाद झाला. यातूनच आरोपी तरुणाने कमलेशच्या डोक्यात आणि अन्य शरीरावर कुदळने निर्दयीपणे वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता, की कमलेश घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हेही वाचा-'..तुला जिवंत सोडणार नाही', अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तरुणाचं विकृत कृत्य दुसऱ्या दिवशी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत नरसिंग टॉकिज जवळील एका दुकानासमोर कमलेश याचा मृतदेह काही स्थानिकांना आढळला. रात्रभर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. छोटू नावाच्या सहकारी मित्रानेच कमलेशची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Nagpur

    पुढील बातम्या