मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /झोपेतच पत्नीला संपवलं; काही तासांत भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना

झोपेतच पत्नीला संपवलं; काही तासांत भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सावखेड (बु) गावची सकाळ हत्येच्या घटनेनं उजडली आहे. एकाच दिवशी पती-पत्नीचा अनपेक्षित पद्धतीने अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव, 30 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सावखेड (बु) गावची सकाळ हत्येच्या घटनेनं उजडली आहे. येथील एका तरुणाने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife brutal murder) केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या पतीने देखील आत्महत्या (Husband commits suicide) करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. एकाच दिवशी पती-पत्नीचा अनपेक्षित पद्धतीने अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पिंपळगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सतीश धनसिंग परदेशी (वय 38) आणि गायत्री सतीश परदेशी (वय 32) असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. ते पाचोरा तालुक्यातील सावखेडा (बु) गावातील रहिवासी आहेत. आरोपी सतीश याने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास गाढ झोपेत असल्याली पत्नी गायत्री यांची गळा आवळून हत्या केली आहे. यावेळी त्यांचा 6 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी बाजूलाच झोपले होते.

हेही वाचा-फेसबुकवरील मैत्री जीवावर बेतली; तरुणाच्या आत्महत्येनं झाला लव्ह स्टोरी The End

आरोपी सतीशने पत्नीची हत्या केल्यानंतर घराबाहेर येऊन आरडाओरडा केला आहे. भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून सतीशचा भाऊ संदीपला जाग आली. त्याने भावाला का ओरडत आहेस आणि इतक्या रात्री कुठे जात आहेस, अशी विचारणा केली. 'तू मला आडवू नकोस, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे,' असं सतीशने संदीपला सांगितलं आणि घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर संदीपने घरी जाऊन पाहिलं असता, सतीशची पत्नी गायत्री मृतावस्थेत दिसली. तर दोन्ही मुलं अजूनही झोपली होती.

हेही वाचा-दिपावलीच्या तोंडावरच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं; बीडमधील हृदय पिळवटणारी घटना

दरम्यान, पहाटे घटनास्थळावरून फरार झालेला सतीशचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर कारवाईच्या भीतीने सतीशने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Husband suicide, Jalgaon, Murder