Home /News /aurangabad /

औरंगाबाद: प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्याच घरात केली चोरी; पण चलाख प्रियकराचा डाव फसला अन्...

औरंगाबाद: प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्याच घरात केली चोरी; पण चलाख प्रियकराचा डाव फसला अन्...

Crime in Aurangabad: आठ दिवसांपूर्वी न्यू बायजीपुरा येथील एका 35 वर्षीय महिलेच्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसताना घरात चोरी करून 57 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

    औरंगाबाद, 30 ऑक्टोबर: आठ दिवसांपूर्वी न्यू बायजीपुरा येथील एका 35 वर्षीय महिलेच्या घरात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसताना घरात चोरी करून 57 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, जिन्सी पोलिसांनी आठ दिवसात गुन्ह्याची उकल करत खऱ्या आरोपीला गजाआड (Accused arrested) केलं आहे. संबंधित आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून फिर्यादी महिलेचा प्रियकर (boyfriend theft 57000 rs in girlfriend's home)असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. या अजब घटनेनं शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी घटनेबाबत अधिक चौकशी केली असता, प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आपण ही चोरी केल्याचं त्याने पोलीस चौकशीत सांगितलं आहे. सिकंदर खान असं अटक केलल्या आरोपी प्रियकराचं नाव असून तो रिक्षाचालक आहे. फिर्यादी महिलेचं गेल्या दोन वर्षांपासून आरोपी प्रियकराशी प्रेमसंबंध सुरू होते. पण फिर्यादी महिला गेल्या काही दिवसांपासून आरोपी प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावत होती. आरोपी विवाहित असल्याने तो सतत तिला लग्नासाठी नकार देत होता. हेही वाचा-'..तुला जिवंत सोडणार नाही', अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तरुणाचं विकृत कृत्य पण प्रेयसी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. यातून आरोपीनं प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्याच घरात चोरी करण्याचा प्लॅन बनवला. त्यानुसार, आरोपीनं 22 ऑक्टोबर रोजी फिर्यादी महिलेला तिच्या आईकडे नेऊन सोडलं. तसेच आपण गावी जाणार असल्याचं प्रेयसीला सांगितलं. पण घरी न जाता प्रियकर परत माघारी गेला आणि त्याने प्रेयसीच्या घरात चोरी केली. आरोपीनं प्रेयसीच्या घरातील 57 हजार रुपयांवर डल्ला मारून गायब झाला होता. हेही वाचा- झोपेतच पत्नीला संपवलं; काही तासांत भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना पण पोलिसांनी स्थानिक खबऱ्याच्या मदतीने या गुन्ह्याची उकल केली आहे. खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून आरोपी रिक्षाचालक सिकंदर याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेत कसून चौकशी केली असता, आरोपी प्रियकराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रियकरानेच चोरी केल्याचं फिर्यादी महिलेला कळताच तिच्याही पायाखालची जमीन सरकली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Theft

    पुढील बातम्या