जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'उंटाच्या तोंडात जिरे'! पेट्रोल डिझेलच्या दर कपातीनंतर ठाकरे सरकारवर फडणवीसांची खरमरीत टीका

'उंटाच्या तोंडात जिरे'! पेट्रोल डिझेलच्या दर कपातीनंतर ठाकरे सरकारवर फडणवीसांची खरमरीत टीका

'उंटाच्या तोंडात जिरे'! पेट्रोल डिझेलच्या दर कपातीनंतर ठाकरे सरकारवर फडणवीसांची खरमरीत टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारने ‘उंटाच्या तोंडात जिरे’! दिले असल्याची टीका केली आहे. (Thackeray government)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 22 मे : मोदी सरकारनंतर ठाकरे सरकारनेही (Thackeray government) पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारने ‘उंटाच्या तोंडात जिरे’! दिले असल्याची टीका केली आहे.

जाहिरात

फडणवीस पुढे म्हणाले की, इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के!  इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’! असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही पेट्रोल डिझेलवरील कर कमी! राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार

अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते! असेही ते म्हणाले.

जाहिरात
जाहिरात

दरम्यान काल मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

जाहिरात

हे ही वाचा : राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या मुद्द्याला मोठं वळणं; संभाजी राजेंनी स्वीकारलं मुख्यमंत्र्यांचं आमंत्रण

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाईने हैराण झालेल्या जनतेला मोदी सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची घोषणा केली.  

जाहिरात

यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहे. त्यानंतर राज्यानेही आज पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम केंद्रसोबत राज्याच्या तिजोरीवरही पडणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात