Home /News /maharashtra /

केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही पेट्रोल डिझेलवरील कर कमी! राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार

केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही पेट्रोल डिझेलवरील कर कमी! राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी झाल्याने राज्याच्या तिजोरीवरही मोठा भार पडणार आहे.

    मुंबई 22 मे : मोदी सरकारनंतर महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्यात पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांनी स्वस्त होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाईने हैराण झालेल्या जनतेला मोदी सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची घोषणा केली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहे. त्यानंतर राज्यानेही आज पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम केंद्रसोबत राज्याच्या तिजोरीवरही पडणार आहे. केंद्र शासनाने काल (शनिवार) पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती. मध्य प्रदेशातले लोक गुजरातमधून भरतायेत पेट्रोल, लांबच लांब रांगा; हे आहे कारण उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये अनुदान पेट्रोल डिझेलसोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे त्या म्हणाल्या. यामुळे वार्षिक सुमारे 6100 कोटींच्या महसुलावर परिणाम होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट होतात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. Gold Price: सोने दरात वाढ होणार की भाव घसरणार? हे 5 फॅक्टर्स ठरतील कारणीभूत पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या