मुंबई, 22 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) निमंत्रण स्वीकारलं असल्याचं समोर आलं आहे. उद्या 12 वाजता संभाजीराजे वर्षावर जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगावा राजेंनी स्वीकारला असून राज्यसभा सहाव्या जागेच्या मुद्द्यावर महत्वाचं वळण लागलं आहे.
संभाजी राजेंनी वर्षावर जाण्याचं निमंत्रण स्वीकारलं असलं तरी ते उद्धव ठाकरेंची ऑफर स्वीकारणार की नाही, याबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.
काय आहे प्रकरण?
मातोश्रीचा चक्रव्यूह संभाजी राजे भेदू शकणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.