मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू - शरद पवार

अनिल देशमुख परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू - शरद पवार

'काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली व सुडाचे राजकारण सुरू केले. मात्र आमचे कार्यकर्ते अशा लोकांना व्याजासह अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही'

'काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली व सुडाचे राजकारण सुरू केले. मात्र आमचे कार्यकर्ते अशा लोकांना व्याजासह अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही'

'काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली व सुडाचे राजकारण सुरू केले. मात्र आमचे कार्यकर्ते अशा लोकांना व्याजासह अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही'

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 17 नोव्हेंबर : 'अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे', असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी नागपूर दौऱ्यावर देशमुखांचा आठवण काढली. तसंच, अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल, ते पुन्हा सक्रिय होतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची आठवण काढली. शरद पवार यांनी आपल्या भाषणात अनिल देशमुख, एकनाथ खडसे, संजय राऊत, हसन मुश्रीफ, अजित पवार व त्याची बहीण या सर्व लोकांवर झालेल्या केंद्रीय संस्थेच्या कारवाईवर टीका केली.

राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, बॅरिकेड्स तोडत आतमध्ये घुसली कार

'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की मी नागपूरला आलो व अनिल देशमुख माझ्या सोबत नाही. अनिल देशमुख यांनी वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सक्षमपणे हाताळलं. मात्र काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुउपयोग करत आहे. काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायची असतात. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली, पाय जमिनीवर नसले त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही, असं म्हणत पवारांनी भाजपवर घणाघात केला.

'भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे, मात्र ही जनता हे हाणून पाडेल, अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल, ते पुन्हा सक्रिय होतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

तसंच, 'सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे असते, काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली व सुडाचे राजकारण सुरू केले. मात्र आमचे कार्यकर्ते अशा लोकांना व्याजासह अद्दल घडवल्या शिवाय राहणार नाही, असा कडक इशारा पवारांनी दिला.

अमेरिकेतल्या महिलेला जडलंय विचित्र व्यसन; स्वमूत्र प्यायल्यावर मिळतं समाधान

उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. आताचे केंद्र सरकार एखाद्या राज्यात त्यांना सत्ता आली नाही तर ते सरकार अस्थिर करण्याचं काम करतं. मात्र या राज्याला स्थिर करून जनतेची कामं करायचं आहे, म्हणून महाविकास आघाडी सरकार आले, असंही पवार म्हणाले.

मात्र विरोधी पक्ष वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून आरोप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुख यांचा दोष नसताना त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना अटक झाली आणि आता आरोप करणारे परमवीर सिंग आहेत कुठे? असा सवालही पवारांनी केला.

‘डिलिव्हरी बॉय’ला ती नेहमी फसवते, तयार करते अनोखा आभास

एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले म्हणून त्यांच्या पत्नीवर आरोप झाले. शिवसेनेचे खासदार यांच्या पत्नीवर आरोप केले. अजित पवार यांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणीवर आरोपकेले, त्यांच्या घरी 20-20 अधिकारी घरी येऊन बसले. मी त्या अधिकाऱ्यांना विचारले तुम्ही का पाच पाच दिवस घरी बसून आहेत, तर ते म्हणाले की दिल्लीवरून आदेश आहे, असंही पवारांनी सांगितलं.

आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असं म्हणत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

First published:

Tags: Anil deshmukh