Home /News /mumbai /

पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की.., अजित पवारांचे सूचक विधान

पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की.., अजित पवारांचे सूचक विधान

'तुम्ही फार डोळ्यावर यायला लागले की बाजूला केलं जातं. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे.

  मुंबई, 10 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे (Maharashtra Budget 2021) आज सूप वाजणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव न घेता विधानसभा निवडणुकीत पराभव कसा झाला याबद्दल सूचक विधान केले आहे. तसंच, ' सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना आपण सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे'  असा टोलाही लगावला. अर्थसंकल्पीय भाषणाला उत्तर देत असताना  अजित पवार यांनी भाजप नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. 'सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्ष राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी वेगवेगळी भूमिका मांडली आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून सुधीर मुनगंटीवार हे सरकार पडणार, सरकार बरखास्त होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, अशी विधानं केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे 'सहन ही होत नाही, सांगता ही येत नाही' काही जणांना आपण या सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे. त्यामुळे ते कधी नाना पटोले यांच्यावर घसरले, तर केदार यांच्यावर टीका करत होते' असा टोला अजितदादांनी लगावला. CID कार्यालयातूनच चोरले 4 UPS,सफाई कर्मचाऱ्याच धाडस; पाहा VIDEO 'तुम्ही फार डोळ्यावर यायला लागले की बाजूला केलं जातं. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे. त्यांची काय अवस्था केली हे सर्वांनी पाहिले. खडसे यांच्यासोबत घडल्यानंतर काही जणांना आपण वाचलो असं वाटत होतं पण काही जणांचा विधानसभेत पराभव झाला. काही जणांना तिकीटं मिळाली नाही' असा टोलाही अजितदादांनी लगावला. 'काही जणांना तिकीट देतो असं सांगून बायकोला तिकीट भरायला लावले आणि बायकोचे तिकीट नाकारले आणि त्यालाही तिकीट मिळाले नाही. आमचे धनंजय मुंडे परळी मतदार संघातून विजयी झाले तिथे त्यांचा (पंकजा मुंडे) पराभव झाला. त्यांचा पराभव धनंजय यांच्यामुळे झाला की दुसऱ्या कुणामुळे झाले हे काही माहिती नाही' अस सूचक विधान करत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला. सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या; सकाळी ऑफिस उघडताच सर्वजण हादरले 'सुंदर कार्यालय या संकल्पनेवर पण टीका झाली. गेल्या ५ वर्षात काही जणांची मोठी सुंदर फार्महाऊसेस झाली. काही नव्या योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. शेती, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यावर आम्ही भर दिला आहे. गेली वर्षभर लॉकडाऊन झाले आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला. मोठे मोठे उद्योग धंदे बंद पडले. राज्यात 1279  कंपन्या बंद झाल्या. पर्यटनाला जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलाय रोजगार निर्मितीसाठी चालना देण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर प्राचीन मंदिरांना निधी दिला आहे', अशी माहितीही अजित पवारांनी दिली. भारतीय नौदलाचं नव सायलेंट किलर अस्त्र 'INS करंज'; पाहा VIDEO 'राज्यात कृषी आणि संलंग्न क्षेत्रात ११.७ टक्के वाढ झाली आहे.  बळीराजाने आपल्या राज्याला वाचवले वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना शून्य टक्के व्याज दिले जाणार आहे.  अशा शेतकऱ्यांना ५० हजारांचं अनुदान देण्याचा आम्ही विचार करतोय', असंही अजित पवार म्हणाले.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे

  पुढील बातम्या