जगावर राज्य करायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता हवी..! असं भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाविक धोरण होतं. प्रकल्प 75 अंतर्गत भारतीय नौदल फ्रान्सच्या तंत्रज्ञांनी विकसीत केलेल्या स्कॉर्पियन पाणबुडींचं संपूर्णपणे भारतीयकरण करून स्वबळावर 6 पाणबुडी बांधत आहे. त्यापैकी INS कलवरी आणि INS खांदेरी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यात. आता याच वर्गातील तिसरी पाणबुडी 'INS करंज' भारतीय नौदलात कर्तव्य बजावण्यास सज्ज झाली आहे. INS करंज पाणबुडीचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे समुद्राच्या पोटात असताना कोणताही आवाज न करता, क्षत्रू देशांच्या युद्धनौका आणि पाणबुडींच्या रडार यंत्रणांना चकवा देऊन मोहीम फत्ते करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.