VIDEO : सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या; सकाळी ऑफिस उघडताच सर्वजण हादरले
VIDEO : सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या; सकाळी ऑफिस उघडताच सर्वजण हादरले
latur Government employee suicide in office : लातुरमधील सरकारी कार्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सकाळी कार्यालयाचं दार उघडताच सहकर्मचाऱ्यांना धक्काच बसला
लातूर, 10 मार्च : गेल्या काही महिन्यात अनेक आत्महत्यांच्या घटना समोर येत आहे. या घटना देशाची चिंता वाढवणाऱ्या आहेत. अशीच एक घटना राज्यातील लातूर जिल्ह्यात घडली आहे. लातूर शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा सांख्यिकी विभागात एका 47 वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सूर्यकांत श्रीमंगले असे त्या 47 वर्षीय व्यक्तीचे नाव असून ते जिल्हा सांख्यिकी विभागात सेवक या पदावर कार्यरत होते. (latur Government employee suicide in office )
या कर्मचाऱ्याने आपल्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह कार्यालय सुरू होण्याच्या वेळेला इतरांना दिसला आणि लोकांच्या पायाखालून जमिनचं सरकली. त्यानंतर कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. प्रथमदर्शनी पोलिसांनीही ही आत्महत्या असावी असा संशय व्यक्त केला आहे. (latur Government employee suicide in office ) मात्र मृतदेहाजवळ आत्महत्या का करीत आहोत, अशा आशयाची चिठ्ठी किंवा मजकूर दिसून आला नाही. (No suicide note found)
लातूर शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा सांख्यिकी विभागात एका 47 वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. pic.twitter.com/QPkKOEddvn
हे ही वाचा-धक्कादायक! कंडक्टरने एसटीमध्येच संपवला जीव, 'या' भीतीमुळे केली आत्महत्या
मृत सूर्यकांत श्रीमंगले हे काही दिवसांपासून आजारी होते. मात्र त्यांनी आत्महत्या कार्यालयात का केली असावी, कार्यालयात आत्महत्या करण्यामागे काही वेगळं कारण आहे का ? कार्यालयातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली का? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.