Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीसांनी बाहेर राहून मदत करणाऱ्या अदृष्य हातांचे मानले आभार, कोण आहेत ते अदृष्य हात?

देवेंद्र फडणवीसांनी बाहेर राहून मदत करणाऱ्या अदृष्य हातांचे मानले आभार, कोण आहेत ते अदृष्य हात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे.

    मुंबई, 4 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकारणाचा निर्णायक क्षण म्हणजेच बहुमत चाचणी (Floor Test) आज पार पडली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सरकारचं बहुमत सिद्ध केले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसच्या विजय वडेट्टवार (Vijay Vadettiwar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना चिमटे काढले. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना उशीर झाल्यामुळे बहुमत चाचणीत सहभागी होता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, आजच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने अप्रत्यक्ष मतं देणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. काही जणांनी अपत्यक्ष मदत केली. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्यांचे मी आभार मानतोच पण ज्यांनी अप्रत्यक्षपणे हा ठराव प्रचंड मताने पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्या अदृष्य हातांचेही आभार मानतो असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 5 मोठे नेते बहुमत चाचणीलाच गैरहजर, सभागृहात प्रवेश नाकारला आजच्या महत्त्वाच्या अशा बहुमत चाचणीसाठी अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतपुरकर, झिशन सिद्दीकी, संग्राम जगताप आणि आण्णा बनसोडे आमदार गैरहजर राहिले. तसेच अनिल देशमुख, नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. तर दत्ता भरणे यांच्या आईच्या निधनामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. ...अन् लघुशंकेसाठी गेलेला राष्ट्रवादीचा आमदार मतदानाला परतलाच नाही; महाविकास आघाडीला आणखी एक धक्का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं. शिंदे सरकारला एकूण 164 मतं मिळाली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 99 मतं मिळाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताची आकडेवारी मोजून दाखवली आणि सर्वात जास्त मतदान हे शिंदे सरकारच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी एकच घोषणाबाजी केली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या