VIDEO : मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, आता कारवाई करणार का ?

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, आता कारवाई करणार का ?

राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतानाही काल मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

कल्याण, 02 जुलै : राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतानाही काल मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचा शुभारंभ काल कल्याणच्या वरप गावात झाला. आणि यावेळी प्लास्टिक बंदीला पाठ फिरवत या कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते. पण ऐवढ्या सगळ्यांपैकी कोणालाच प्लास्टिक बंदी आठवण नाही यात आश्चर्य आहे.

हेही वाचा...

महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

बुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहिला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा

पाणी वाटण्यासाठी बंदी असलेले प्लास्टिकचे ग्लास या कार्यक्रमात वापरण्यात आले. त्यामुळे आता सरकार यांच्याकडून दंड वसूल करणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयोजित कार्यक्रमातच हा सगळा प्रकार घडला आहे. त्यामुळे नियम बनवणाऱ्यांनीच सर्रास नियम तोडले असं म्हणायला काही हरकत नाही.

हेही वाचा...

धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक

'मला कोणाचा खून करायला सांगितलं तर मी...' - राज ठाकरे

बेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी

First published: July 2, 2018, 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading