नवी दिल्ली, 02 जुलै : दिल्लीच्या बुरांडी भागात काल एकाच घरात 11 मृतदेह सापडले आहेत. यात 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. सगळ्यात गंभीर म्हणजे या सर्व मृतांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. या प्रकरणात आता यातील मृत वृद्ध आईची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण इतर 10 लोकांची आत्महत्या की हत्या हे अद्याप स्पष्ट झाली नाही. पण पोलीस तपासाअंतर्गत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या घरात एक रजिस्टर मिळालं. त्या रजिस्टरचं थेट कनेक्शन हे या 10 जणांच्या मृत्यूशी आहे. कारण मरण्याचा संपूर्ण प्लान या रजिस्टरमध्ये लिहला आहे. कोण कुठे आणि कसं मरणार याचा संपूर्ण विश्लेषण या रजिस्टरमध्ये लिहलं आहे. कोण कोणत्या जागेवर उभं राहून फाशी घेणार याचा सगळा तपशील यात लिहला आहे आणि यात लिहल्याप्रमाणेच या सगळ्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. क्राईम ब्रांचच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रजिस्टरच्या सुरूवातीच्या पानांवर सगळ्यांच्या नावासकट त्यांची फाशी घेण्याची जागा याबद्दल लिहलं आहे. कोण खुर्चीवरून फाशी घेणार, कोण दरवाजाजवळ फाशी घेणार हे सगळं या रजिस्टरमध्ये लिहलं आहे.
धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक
त्याचबरोबर तोंडात कापड आणि डोळ्याला काळी पट्टी बांधली की आपल्या मोक्ष मिळेल असंही यात लिहण्यात आलं आहे. त्यामुळे हा जादुटोण्याचा तर प्रकार नाही ना याचा पोलीस आता तपास घेत आहेत. दरम्यान, या 11 लोकांच्या कुटुंबात 2 भाऊ होते. या दोघांच्या पत्नी, दोघांची मुलं, एक आई आणि त्यांची बहिण असल्याची माहिती मिळत आहे. यात 10 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाले आणि त्यांच्या आईचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या मिळाला. हेही वाचा…