S M L

'मला कोणाचा खून करायला सांगितलं तर मी...' - राज ठाकरे

मला एखाद्याचा खून करायला सांगितलं तर... !

Renuka Dhaybar | Updated On: Jul 2, 2018 09:47 AM IST

'मला कोणाचा खून करायला सांगितलं तर मी...' - राज ठाकरे

पुणे, 02 जुलै : राज ठाकरेंना एक खून करायचाय. ऐकून धक्का बसेल, पण स्वतः राजच तसं म्हणाले आहेत. नको तिथे सेल्फी काढणाऱ्यांना चिमटा काढण्यासाठी राज ठाकरेंनी मोबाईलमध्ये कॅमेरा बसवणाऱ्याचा खून करायची इच्छा मिश्किल शब्दात बोलून दाखवली. पुण्यामध्ये अहिल्याबाई होळकर उद्यानाचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी ते बोलेत होते.

उद्यानाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढण्यात धन्यता मानणाऱ्यांना राज ठाकरेंनी असा टोला लगावला आहे. आमच्या नगरसेवकांनी प्रभागात कचऱ्यासंदर्भात चांगली कामं केलीत पण निवडणुकीत मतदान मात्र होत नाही. मग कोण काम करणार असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक


तर फक्त निवडणुकीच्या तोंडावरच येऊन थापा मारण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पुण्यात वसंत मोरे यांच्या प्रभागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

आमच्या नगरसेवकांनी प्रभागात कचऱ्यासंदर्भात चांगली काम केलीत. पण निवडणुकीत मतदान मात्र होत नाही. मग कोण काम करतील असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मी जे जे बोललो ते सगळे ठोकताळे खरे होत असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा...

Loading...
Loading...

इंच इंच विकू हेच राज्यकर्त्यांचं धोरण - राज ठाकरे

बुरांडी मृत्यू प्रकरण : रजिस्टरमध्ये लिहला होता मृत्यूचा प्लान, ठरल्या होत्या फाशी घेण्याच्या जागा

बेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 09:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close