मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाचा परिणाम! मुंबईत जन्मदरामध्ये मोठी घट; 'ही' कारणं आली समोर

कोरोनाचा परिणाम! मुंबईत जन्मदरामध्ये मोठी घट; 'ही' कारणं आली समोर

कोरोना आणि लॉकडाऊन (Lockdown Resulted in Lower Birth Rates) यामुळे अनेक कुटुंबे शहराबाहेर किंवा आपल्या गावी गेली. याचा परिणाम म्हणजे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये मुंबईत जन्मदरात (Birth Rate) 26 टक्क्यांची मोठी घट झाली आहे

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 11 जुलै : देशभरात मागील वर्षभरापेक्षा अधिक काळाहून थैमान घातलेल्या कोरोनानं माणसाच्या जीवनशैलीतही अनेक बदल घडवले आहेत. यातच आता कोरोनाच्या परिणामाबाबतची आणखी एक माहिती समोर आली आहे. कोरोना आणि लॉकडाऊन (Lockdown Resulted in Lower Birth Rates) यामुळे अनेक कुटुंबे शहराबाहेर किंवा आपल्या गावी गेली. याचा परिणाम म्हणजे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये मुंबईत जन्मदरात (Birth Rate) 26 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. विशेष बाब म्हणजे 2015 नंतर पहिल्यांदाच जन्मदरात (Decline in Mumbai's Birth Rate) इतकी मोठी घट नोंदवली गेली आहे.

गंगा नदीच्या पाण्यात कोरोना नाही; मात्र आढळले...

ही बाब पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे. या आकडेवारीनुसार, 2015 मध्ये 1 लाख 74 हजार बालकांचा जन्म झाला होता. 2016 मध्ये यात सुमारे 21 हजार 950 नं घट झाली होती आणि या सालातील आकडा 1 लाख 52 हजार होता. यानंतरच्या वर्षांमध्ये कधी या आकड्यात काही प्रमाणात वाढ तर कधी घट नोंदवली गेली. 2019 साली मुंबईत 1 लाख 48 हजार बालकांचा जन्म झाला. मात्र, 2020 मध्ये यात सर्वात मोठी 42 हजारांची घट झाल्याचं समोर आलं आहे.

सावधान ! अनेक देशांत डेल्टाचे हल्ले सुरू, WHO नं दिलेले ‘हे’ तपशील वाढवतायत भीती

ही घट 2019 च्या तुलनेत सुमारे 26 टक्के इतकी मोठी आहे. 2020 मध्ये जन्म झालेल्या बालकांमध्ये 52 टक्के मुलं आणि 48 टक्के मुली होत्या. तर, 2019 मध्ये हे प्रमाण क्रमशः 47.23 आणि 44.24 इतकं होतं. दुसरा आणखी एक मोठा बदल म्हणजे घरी प्रसूती होण्याची संख्या. 2015 साली घरीच प्रसूती झालेल्या महिलांची संख्या 1 हजार 465 होती. मात्र, 2020 मध्ये यात मोठी घट झाली असून हा आकडा 256 वर आला आहे.

चिंताजनक! म्हशींमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; माणसांसाठी ठरणार घातक?

जन्मदरातील घटेचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोना साथीच्या काळात लोकांचं मोठ्या प्रमाणात झालेलं स्थलांतर. आणखी एक कारण म्हणजे कोरोना काळात अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना गावीच ठेवलं आहे. कामगार वर्गाचं मोठ्या प्रमाणात झालेलं स्थलांतर हे प्रसूती आणि जन्मदरातील घटेचं महत्त्वाचं कारण असल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Birth rate, Corona, Mumbai