मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /सावधान ! अनेक देशांत डेल्टाचे हल्ले सुरू, WHO नं दिलेले ‘हे’ तपशील वाढवतायत भीती

सावधान ! अनेक देशांत डेल्टाचे हल्ले सुरू, WHO नं दिलेले ‘हे’ तपशील वाढवतायत भीती

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण होत असून कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिले आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण होत असून कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिले आहेत.

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण होत असून कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली, 10 जुलै : भारतातील कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरत असली, तर अनेक राज्यांत अजूनही कोरोना व्हायरला धुमाकूळ सुरु आहे. केरळमध्ये (Kerala) तर अद्यापही दैनंदिन रुग्णांची आकडेवारी पाच आकडी नोंदवली जात आहे. अशा परिस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं (Delta Virus) आक्रमण होत असून कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन (Saumya Swaminathan) यांनी दिले आहेत.

गेल्या 24 तासांतील आकडेवारी

जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाची लाट सध्या धुमाकूळ घालत असून गेल्या 24 तासांत 50 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याचं स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचं चित्र दिसत असून कोरोनाचं आव्हान पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचंच हे चिन्ह आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या आक्रमणाला सध्याचा डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत असून भारताप्रमाणे इतर देशांनाही या व्हायरसचा धोका असल्याचं म्हटलं आहे.

सर्व भागात आकडेवारीत वाढ

जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यक्षेत्रातील 5 पैकी 4 भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. अफ्रिकेत मृत्युदर वाढला असून एका आठवड्यात तो 30 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर पोहोचल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावणं आणि सुऱक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीत असणारा ढिसाळपणा या दोन कारणामुळे पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे.

हे वाचा -मोठी बातमी: लस घेतली असेल तरच मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी?

अनेक देशात निर्बंध हटवले

अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना आटोक्यात आल्यामुळं मास्कची सक्ती हटवण्यात आली आहे. बाजारपेठा सुरू होत आहेत. अशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या शक्यतेमुळे सर्वांनाच धडकी भरली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Who