Home /News /national /

गंगा नदीच्या पाण्यात कोरोना नाही; मात्र आढळले 'हे' हानिकारक विषाणू

गंगा नदीच्या पाण्यात कोरोना नाही; मात्र आढळले 'हे' हानिकारक विषाणू

गंगेच्या पाण्याचा पीएच, रंग, डिझॉल्व्ह्ड ऑक्सिजन (DO), बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (BOD), केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD), नायट्रेट, क्लोराइड, अमोनिअम नायट्रोजन, एकूण फॉस्फरस यांची तपासणी करण्यात आली.

    लखनऊ, 10 जुलै : गंगा ही देशवासीयांसाठी पवित्र नदी. तरीही गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे. त्याबद्दल अनेकदा चर्चा सुरू असते. अलीकडेच या पाण्यात कोरोनाबाधितांचे मृतदेह सापडल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर, गंगा नदीच्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) ते बिहार (Bihar) यादरम्यानच्या (Ganges River) प्रवाहातल्या पाण्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) अंश नसल्याचं स्पष्ट झालं आहे. गंगा नदीच्या 13 घाटांवर घेण्यात आलेल्या सर्व 67 नमुन्यांची आरटीपीसीआर टेस्ट (RT PCR Test) निगेटिव्ह आली आहे; मात्र गंगा नदीच्या पाण्यात हानिकारक बॅक्टेरिया (Bacteria) आढळून आले आहेत. तसंच गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे; मात्र याचा जलचरांवर प्रतिकूल होणार नसल्याचंही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय विषविज्ञान संशोधन संस्थेने (IITR) लखनऊमध्ये याबाबत दोन टप्प्यात तपासणी केली असून, त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचं प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयआयटीआर या संस्थांना गंगेच्या पाण्याची चाचणी करण्याचे आदेश 'नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा'तर्फे देण्यात आले होते. 24 मे ते 6 जून आणि 10 जून ते 21 जून अशा दोन टप्प्यांत गंगेच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यांच्या तपासणीनंतर अंतिम अहवाल तयार करण्यात आला. कडक लॉकडाऊन करा किंवा पूर्ण मोकळीक द्या, आरोग्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं, मिळालं ‘हे’ उत्तर दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटीआरच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी स्वतः पीपीई किट (PPE Kit) परिधान करून गंगा नदीतून नमुने जमा केले. काही ठिकाणी नावेत चढून प्रवाहाच्या मध्य भागातून नमुने घेण्यात आले. गंगा नदीच्या पाण्यात बीओडी म्हणजेच बायोकेमिकल ऑक्सिजनची मागणी (BOD) प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं आढळून आलं. वास्तविक नदीतल्या एक लिटर स्वच्छ पाण्यात बीओडीचं प्रमाण 3 मिलिग्रॅमपेक्षा कमी असणं आवश्यक आहे; पण गंगेत अनेक ठिकाणी हे प्रमाण एक लिटर पाण्यात 20 ते 25 मिलिग्रॅम इतकं होतं. यामुळे जलचरांना कोणताही धोका नाही. परंतु, या पाण्यात स्नान केल्यास कदाचित घातक ठरू शकतं, असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं. गंगेच्या पाण्याचा पीएच, रंग, डिझॉल्व्ह्ड ऑक्सिजन (DO), बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (BOD), केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD), नायट्रेट, क्लोराइड, अमोनिअम नायट्रोजन, एकूण फॉस्फरस यांची तपासणी करण्यात आली. तसंच बॅक्टेरियोलॉजिकल पॅरामीटर्समध्ये टोटल कॉलिफॉर्म्स, फीकल कॉलिफॉर्म्स, ई-कोलाय आणि फिकल स्ट्रेप्टोकोकी आदी तपासण्यात आले. कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर तपासणीदेखील करण्यात आली. सावधान ! अनेक देशांत डेल्टाचे हल्ले सुरू, WHO नं दिलेले ‘हे’ तपशील वाढवतायत भीती मानवी शरीरातल्या कोरोनाच्या तपासणीसाठी आरटीपीसीआर टेस्ट केली जाते; मात्र गंगा नदीत या घातक विषाणूंचा अंश आहे की नाही हे तपासण्यासाठीदेखील वैज्ञानिकांना आरटीपीसीआर टेस्टचा आधार घ्यावा लागला. आयआयटीआरचे प्रभारी संचालक प्रा. एस.के. बारिक यांनी सांगितलं, की हीच पद्धत जगभरात वापरली जाते. आयआयटीआरचे वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक डॉ. ए.बी. पंत आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. प्रिती चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखालील पथकानं हे संशोधन केलं. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर विविध मापदंडांचं विश्लेषण करण्यात आलं. आयआयटीआरचे प्रभारी संचालक प्रा. एस. के. बारिक यांनी सांगितलं, की उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या 13 शहरांमधून नमुने घेण्यात आले होते. यात 12 नमुने हे गंगा नदीतून आणि 1 नमुना यमुना नदीतून घेण्यात आला. या नमुन्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली. परंतु, काही फिजिओ केमिकल पॅरामीटर्स (Physio Chemical Parameters) प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं आढळून आलं. चिंताजनक! म्हशींमध्ये आढळला कोरोनाचा नवा Bovine व्हेरिएंट; माणसांसाठी ठरणार घातक? ई-कोलाय (E-Coli) हा बॅक्टेरिया मनुष्य आणि जनावरांच्या पोटात नेहमीच आढळून येतो. यामुळे अनेकदा कोणताही अपाय होत नाही. परंतु, काही जणांमध्ये ओटीपोटात दुखणं किंवा अतिसार यांसारखी लक्षणं या बॅक्टेरियामुळे दिसतात. अनेकदा यामुळे किडनीचं कार्य बंद पडू शकतं. परिणामी रुग्णाचा मृत्यू होतो. हा बॅक्टेरिया गंगेच्या पाण्यात आढळला. फिकल स्ट्रेप्टोकोकी हा बॅक्टेरिया उन्नाव, वाराणसी, प्रयागराज, गाजीपूर, कानपूरमधील पाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळून आला. तसंच बिहारमधील सारण येथील एका, तर भोजपूरमधील तीन नमुन्यांमध्ये स्ट्रेप्टोकोकी आढळून आला आहे. हाही धोकादायक बॅक्टेरिया असून, त्यामुळे आतड्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
    First published:

    Tags: Coronavirus, Ganga river, Uttar pradesh

    पुढील बातम्या