मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार!...तर रस्त्यावर उतरुन चोप देऊ, मनसेचा सज्जड इशारा

कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार!...तर रस्त्यावर उतरुन चोप देऊ, मनसेचा सज्जड इशारा

कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे.

कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे.

कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे.

मुंबई, 26 जून: कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाट्टेल त्या दरात सामान खरेदी केलं आहे. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांना काम दिलं जात आहे. मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, असा घणाघाती आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ, असा सज्जड इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

हेही वाचा...शिवसेनेनं सत्ता समिकरण पाहून 27 गावांचे केलं तुकडे, भाजप नेत्याचा घणाघाती आरोप 

संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, शवपिशव्यांच्या खरेदीत सुद्धा चांगल्या दर्जाच्या पिशव्या पुरवणाऱ्या औरंगाबादच्या वेदांत इन्नोटेक कंपनींचं कंत्राट रद्द करून इथल्या कंत्राटदारांना दिलं जात आहे. कारण इथल्या कंत्राटदारांच्या गॅंगला बाहेरचा माणूस नको असतो, असा आरोपही देशपांडे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करुन दोषींवरुन कारवाई करावी अथवा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन चोप देऊ असंही देशपांडे यावेळी म्हणाले.

मनसेचं बारीक लक्ष....

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासून मनपा काही ना काही खरेदी करत आहे. मात्र, या खरेदीवर मनसेचं बारीक लक्ष आहे. मनपाच्या भ्रष्टाचारात अनेक लोक भरडले जात आहेत. मृतदेहांच्या पिशव्यांबाबतचा मुद्दाही आता समोर आला आहे. यात मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे वेदांत इन्नोटेक कंपनीचं या पिशव्यांचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. मनपानं रक्कम ठरवावी पण दर्जाशी तडजोड करुन लोकांशी खेळ खेळला जातोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संदीप कल्याणकर यांनी सांगितलं की, समुद्रातून मृतदेह काढले जातात, ते ठेवण्यासाठी आम्ही 10 वर्षांपासून पिशव्या बनवत आहे. आमच्या कंपनीची बॅग सुमारे 200 किलो वजन उचलू शकते. आमची बॅग सगळ्या निकषांप्रमाणे आहे. योग्य त्या दर्जाची आहे. पण आम्ही औरंगाबादचे आहोत. त्यामुळे आम्हाला यातलं काही कळत नाही, असा अपप्रचार करण्यात आला.

फोन करून टक्केवारी मागितली....

संदीप कल्याणकर यांनी सांगितलं की, त्यांना एकाने फोन केला आणि टक्केवारी मागितली. मनपाचं कंत्राट हवं असेल तर टक्केवारी दिली तरच पुढचं काम मिळेल, असं सांगण्यात आलं. त्याला विरोध केल्यानं कंत्राट रद्द करण्यात आला.

हेही वाचा...धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारनं केली आत्महत्या

कोणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आडकाठी करुन तिथले प्रस्थापित कंत्राटदार त्रास देत आहेत. बीकेसीत जे कोरोना केंद्र स्थापन करण्यात आलंय त्यात निविदा न काढता कोरोनाच्या नावाखाली कामं देण्यात आलेली आहेत. 'पेंग्विन गॅंग' सगळं हे करत आहे. कोणी वरुण सरदेसाईचा ओळखीचा म्हणून काम दिलं जात असल्याची गौप्यस्फोट संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मनसेच्या पत्रकार परिषदेशील महत्त्वाचे मुद्दे..

-स्थायी समितीची बैठक का होत नाही? थेट खरेदी का केली जात आहे.

- पत्रकारांना काय खरेदी झाली हे कळेल म्हणून स्थायी समितीची बैठक घेतल्या जात नाहीत.

-ॲंटीजन बॉडी टेस्टच्या किटची किंमत कमी होणार असताना आत्ताच मुंबई मनपा का लवकर खरेदी करतेय?

-जे क्वारंनटाईन सेंटर केलंय त्यात अनेक जागा रिकाम्या आहेत

-शव पिशव्या प्रकरणात विवेकानंद गुप्ता आणि पेंग्विन गॅंग याच्या मागे आहे.

-सगळ्या खरेदीची चौकशी झाली पाहिजे आणि ऑडिट झालं पाहिजं

-निविदा न काढता बीकेसीचं काम झालंय त्याचीही चौकशी झाली पाहिजे

-नाही तर अशा अधिका-यांना रस्त्यावर उतरुन मनसे चोप देईल

-मनपात कंत्राटदारांच्या कोणत्या गॅंग आहेत आणि कोण त्याला पोसतंय ते सगळ्यांना माहिती आहे.

-कोणत्याही बाहेरच्या आणि मराठी कंत्राटदाराला इथे येऊ दिलं जात नाही.

First published:

Tags: Bjp mns, BMC, Corona, Corona virus, Coronavirus, Shiv sena