मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेनं सत्ता समिकरण पाहून 27 गावांचे केलं तुकडे, भाजप नेत्याचा घणाघाती आरोप 

शिवसेनेनं सत्ता समिकरण पाहून 27 गावांचे केलं तुकडे, भाजप नेत्याचा घणाघाती आरोप 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असलेल्या 27 गावांचे राज्य सरकारने तुकडे करून 18 गावांची स्वतंत्र नागरपरिषद केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असलेल्या 27 गावांचे राज्य सरकारने तुकडे करून 18 गावांची स्वतंत्र नागरपरिषद केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असलेल्या 27 गावांचे राज्य सरकारने तुकडे करून 18 गावांची स्वतंत्र नागरपरिषद केली आहे.

कल्याण, 26 जून: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असलेल्या 27 गावांचे राज्य सरकारने तुकडे करून 18 गावांची स्वतंत्र नागरपरिषद केली आहे. मात्र, या नगरपरिषदेला स्थानिकांसह नगरसेवकांनी देखील विरोध केल्याने 18 गावांची नगरपरिषद ऐन कोरोनाच्या संकटात चर्चेत आली आहे. शिवसेनेनं हा निर्णय राजकीय समीकरण समोर ठेऊन घेतला असल्याचा आरोप नगरसेवक आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर भोईर यांनी केला आहे.

हेही वाचा..धक्कादायक! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारनं केली आत्महत्या

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असलेल्या 27 गावांचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहीला आहे.२७गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी संघर्ष समितीने केली होती. तर 27 गावातील नगरसेवकांनी स्वतंत्र नगरपरिषदेला विरोध करत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ठेवण्याची मागणी केली होती. मात्र संघर्ष समितीसह नगरसेवकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी बाजूला सारून 18 गावांची नगरपरिषद स्थापन केली आहे. त्यामुळे आता 27 गावातील वातावरण पुन्हा नव्या विषयाने ढवळून निघाले आहे. तर शिवसेनेनं हा निर्णय राजकीय समीकरण समोर ठेऊन घेतला असल्याचा आरोप नगरसेवक आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मोरेश्वर भोईर यांनी केला आहे. 27 गावांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून वगळू नये यासाठी शिवसेनेसह भाजपाच्या नगरसेवकांनी केली होती. तर 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी सर्व पक्षीय संघर्ष समिती आग्रही आहे.मात्र अचानक झालेल्या या निर्णयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या गावांची होणार स्वतंत्र नागरपरिषद

घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदीवली तर्फे अंबरनाथ, आडिवली ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा नव्या  कल्याण उपनगर नगरपरिषदेत समावेश.

30 दिवसांत आक्षेप शासनाला सादर करण्याची मुभा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून 27 गावांची विभागणी करून 18 गावांची स्वतंत्र नागरपरिषद स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, संघर्ष समितीने कोकण विभागीय आयुक्तांकडे केलेली स्वतंत्र नागरपरिषदेच्या मागणीला सरकारकडून कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नव्हती. आता पुन्हा अधिकसुचना काढून सरकारने आक्षेप मागितले आहेत. त्यामुळे आता संघर्ष समिती काय करणार? आक्षेप घेणार का? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

"आम्ही 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेवर ठाम आहोत.तातडीने संघर्ष समिती बैठक बोलावली आहे.बैठकी नंतर पुढील भूमिका जाहीर केली जाईल.", असं 27 गाव संघर्ष समिती अध्यक्ष गुलाब वझे यांनी म्हटलं आहे.

27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन झाली पाहिजे. आम्ही संघर्ष समिती सोबत आहोत, कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...कोरोना काळात नोकरी गेली, तरी झाला नाही हताश, इंजिनीअरनं सुरू केलं चक्क इडली सेंटर

27 गावातील जनतेने दिलेल्या लढ्याला न्याय मिळाला नाही.मी समाजबंधवांसोबत आहे. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका किंवा महानगरपालिका स्थापन झाली असती.तर २७ गावांच्या विकास काम अधिक जलदगतीने झाली असती.मी समाजबंधवां सोबत आहे., अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितलं आहे. तर राष्ट्रवादीनं निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, उरलेले 9 गाव घेण्यासाठी प्रयत्न करणार करणार आल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी म्हटलं आहे.

 

First published:

Tags: Kalyan, KDMC, Udhav thackeray