पोस्टनुसार, विरल याने सियाचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्याशी संवाद साधला असता, अर्जुन आणि सरिन यांच्यात बुधवारी रात्री एक सॉंगच्या संदर्भात शेवटचं बोलणं झालं होतं. तेव्हा तिचा मूड चांगला होता. 19 तासांपूर्वी शेअर केला होता व्हिडीओ सिया हिने आत्महत्या करण्यापूर्वी 19 तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात ती एका पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सियाने तिच्या एका स्टोरीत डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. तसं पाहिलं तर तिनं हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पाच दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. सियाचे इंस्टाग्रामवर 91 हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत. हेही वाचा...एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेलेत सुशांतचे वडील चाहत्यांना बसला धक्का... सियानं आत्महत्या केल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सियावर इतक्या कमी वयात अशी काय वेळ आली होती की, तिला टोकाचं पाऊल उचलावं लागलं, असा प्रश्न समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.