मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी! नाहीतर होईल न्यूयॉर्कसारखी स्थिती

मुंबई-पुण्यासाठी आता ही शेवटची संधी! नाहीतर होईल न्यूयॉर्कसारखी स्थिती

AIIMS च्या संचालकांनी कोरोनाची साथ देशाच्या काही भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. या भागांत वेळीच खबरदारी घेतली नाही तर...

  • Share this:

मुंबई, 7 एप्रिल : भारतात Coronavirus ची साथ अद्याप दुसऱ्या टप्प्यात आहे. याचा अर्थ ही साथ कम्युनिटी स्प्रेडच्या स्वरूपात पसरलेली नाही. पण AIIMS च्या संचालकांनी मुंबईसाठी धोक्याचा इशारा दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची साथ काही भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. आता ज्या भागात हा टप्पा गाठला आहे, तिथेच ती आटोक्यात ठेवली नाही, तर संपूर्ण शहरभर हा व्हायरस झपाट्याने पसरेल आणि मग आता न्यूयॉर्क किंवा सुरुवातीला वुहानची झाली, तशी अवस्था येईल. धक्कादायक म्हणजे गुलेरिया यांनी या थोडक्या भागांमध्ये मुंबईचं नाव घेतलं.

अजूनही मुंबई-पुण्यातले नागरिक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोटरणे पाळत नाहीत. आता त्यांनी या साथीचं गांभीर्य ओळखलं नाही, तर नंतर उशीर झालेला असेल, असाच याचा अर्थ आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये सध्या ही स्थिती आली आहे. कालच्या एका दिवसात अमेरिकेत 1500 जणांचा बळी गेला. कोरोनाग्रस्तांची संख्या अमेरिकेत लाखावर पोहोचली आहे. ती स्थिती टाळायची असेल तर आत्ताच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरात राहायला हवं. अनावश्यक कारणासाठी बाहेर जाणं टाळायला हवं.

राज्यात Coronavirus चा फैलाव वाढत आहे. मुंबई देशात सर्वांत मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. आज दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त मुंबई परिसरातच 116 रुग्ण दाखल झाले. ठाण्यात 2 रुग्ण सापडले. याशिवाय 5 रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्याच्या एकूण आकड्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबईतच आहेत. मुंबईत आतापर्यंत 590 रुग्ण दाखल झाले आहेत. ही 7 एप्रिलला दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या नोंदींची आकडेवारी आहे..

90 वर्षीय आई-बापाला मुलांनी सोडलं वाऱ्यावर, पोलीस अधिकारी झाला श्रावण बाळ

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणेकरांनाही आठवड्यातून एकदाच आवश्य गोष्टींच्या खरेदीसाठी घराबाहेर पडा, असं आवाहन केलं आहे. कारण कोरोनाव्हायरसने आता लोकलाइज्ड कम्युनिटी स्प्रेडच स्वरून दाखवायला सुरुवात केली आहे. घरातल्या एकाच व्यक्तीने आठवड्यातू एकदा किंवा फारतर दोनदा बाहेर जावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर KDMCने जारी केले कठोर आदेश

देशाच्या काही भागात Coronavirus तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. 'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी आहे, असं गुलेरिया म्हणाले.

मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आकडा 41 ने वाढला

'आज तक'शी बोलताना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे AIIMS संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले, "संपूर्ण देशाचा विचार केला, तर सध्या भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्ये आहे. लोकलाइज्ड स्प्रेड असं त्याला म्हणतात." पण कोरोनाव्हायरसची लागण कुठून झाली याचा कुठलाही थांग लागत नसलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. हे तिसऱ्या टप्प्याचं लक्षण आहे. "मुंबईचा काही भाग आणि देशातले कोरोना हॉटस्पॉट ठरलेले भाग इथे मात्र हा कम्युनिटी स्प्रेड इतक्या झपाट्याने होतो आहे की तिथे या साथीने तिसरी स्टेज गाठली आहे", असं गुलेरिया म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते, हा लोकलाइज्ड कम्युनिटी स्प्रेड आहे तिथेच रोखला आणि तो आणखी इतर परिसरांमध्ये पसरू दिला नाही, तर भारत बराच काळ दुसऱ्या टप्प्यात राहू शकतो आणि कोरोनाग्रस्तांची संख्या स्थिर राहू शकते.

कोरोनाव्हायरसचा फैलाव ज्या वेगाने होतो, त्या वेगानुसार ही साथ कुठल्या टप्प्यात आहे हे ओळखता येतं आणि त्यानुसार उपाययोजना करता येतात. भारतात आता हळूहळू चाचणीचं प्रमाण वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. कोरोना विषाणूचा फैलाव गुणाकार पद्धतीने वाढतो. त्याला डबलिंग इफेक्ट म्हणतात. अत्यल्प काळात रुग्णांची संख्या दुपटीने वाढते. हा डबलिंग इफेक्ट वाढला की तिसरा टप्पा जवळ आला असं समजलं जातं.

तबलिगी जम्मातच्या मेळाव्यामुळे दिल्लीत कम्युनिटी स्प्रेडच्या केसेस वाढल्या. मुंबईतही काही भागात हा संसर्ग कम्युनिटी स्प्रेड टप्प्यात आलेला दिसतो. त्यामुळे आता चिंता वाढली आहे. घरात बसणे आणि शक्य तेवढा बाहेरचा संपर्क टाळणे हाच यावरचा प्रभावी उपाय आहे.

कोरोनासारख्या गंभीर संकटातही कुटुंबातील व्यक्तीला अखेरचा निरोप देताना घडली चूक

First published: April 6, 2020, 11:02 PM IST

ताज्या बातम्या